गोंदिया: भव्य उद्घाटन समारंभ व मोफत आरोग्य तपासणी शिबिर २८ रोजी..

388 Views

 

गोंदिया : भारतीय प्रशासकीय सेवेतील नामवंत सेवानिवृत्त अधिकारी डॉ.एस.एम.राजु यांनी संशोधित केलेल्या नियो आयुर्वेदिक पध्दतीने दीर्घ व जुन्या आजारावर उपचारासाठी क्लिनिकचे भव्य उद्घाटन समारंभ २८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता श्रीजी कॉम्पलेक्स येथे आयोजित करण्यात आले आहे.

यासोबतच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी होणार्‍यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन खा.सुनिल मेंढे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी अतिथी म्हणून जि.प.बांधकाम सभापती संजय टेंभरे, आयुर्वेदिक शल्य चिकीत्सक डॉ.बी.के.चौधरी, गौतम लब्धी, सल्लागार विवेकप्रकाश आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

डॉ.एस.एम.राजु यांनी संशोधित केलेल्या नियो आयुर्वेदिक पध्दतीने दीर्घ व जुन्या अशा १७० पेक्षा अधिक प्रकारच्या आजारावर उपचार करण्यात येणार आहे. रूग्णांना उपचार मिळून आजाराचे निदान व्हावे, याकरीता रूग्णालयाचे शुभारंभ गोंदिया येथील श्रीजी कॉम्पलेक्स येथे होत आहे. यानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले असून लाभ घेण्याचे आवाहन डॉ.गायत्री सोनवाने (धाबेकर), सौ.अश्विनी जयंत शुक्ला, योगेश सोनवाने यांनी केले आहे.
००००००

Related posts