माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या पाठपुराव्यामुळे मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा

157 Views  राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये ऐतिहासिक निर्णय गोंदिया/भंडारा। महाराष्ट्रातील मच्छीमार समाजासाठी कालचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला. राज्यातील मत्स्यव्यवसायाला शेतीच्या समकक्ष दर्जा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे मत्स्यव्यवसायाशी संबंधित लाखो कुटुंबांना आता शासकीय सवलती मिळणार आहे. त्यांच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडणार आहे. कृषी क्षेत्राला जश्या योजना आणि अनुदान उपलब्ध आहेत, त्या आता मत्स्यव्यवसायिकांसाठीही खुले होणार आहेत. हा ऐतिहासिक निर्णय सहजासहजी झालेला नाही. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्या राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके…

Read More