738 Views वर्धा : बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावर मध्यरात्री खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात बस उलटून डिझेल टँक फुटल्याने बसला आग लागली आणि झोपेतच २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात अनेकांनी आपली मुलं, नातेवाईक गमावली, तर काहींचं अख्खं कुटुंब गेलं. यापैकीच अवंती पोहनीकर ही तरुणी देखील होती. अवंतीचा या अपघातात होरपळून मृत्यू झाला. तिच्या अशा अकाली जाण्याने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अवंती पोहनीकर ही वर्ध्याची असून ती इंजिनीअर होती. पुण्याला जाण्यासाठई शुक्रवारी सायंकाळच्या खासगी ट्रॅव्हल्सने ती निघाली होती. परंतु मध्यरात्री बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर झालेल्या…
Read MoreMonth: July 2023
समृद्धि महामार्ग अपघात: मृतांची ओळख पटविण्यात अडचण, सामूहिक अंत्यसंस्काराचा निर्णय..
456 Views बुलढाणा: समृद्धी महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री बुलढाण्यात खाजगी ट्रॅव्हल्सला झालेल्या भीषण अपघातात 26 प्रवाशांच्या होरपळून मृत्यू झाला. यात वर्ध्यातील 14 लोकांचा समावेश होता. या सर्वांवर रविवारी बुलढाण्यात सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह मोठ्या प्रमाणात भाजले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख पटविण्यात अडचण येत आहे. त्यामुळे मृतांच्या कुटुंबियांशी चर्चा करून रविवारी बुलढाण्यात त्यांच्यावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुलढाणा येथे गेलेले वर्ध्याचे तहसीलदार रमेश कोळपे यांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे. या अपघाताची माहिती मिळताच ट्रॅव्हल्समध्ये असलेल्या प्रवाशांचे नातेवाईक आधीच बुलढाणा येते…
Read More‘विमाशि संघा’च्या आंदोलनापूर्वीच एक मागणी पूर्ण राज्यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मिळणार ४ टक्के महागाई वाढ भत्ता
308 Views विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे शुक्रवार ७ जुलै २०२३ ला धरणे/निदर्शने आंदोलन गोंदिया : राज्यातील खासगी अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्था खासगी अनुदानित आश्रमशाळेत कार्यरत शिक्षक – शिक्षकेतर व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा थकबाकी हप्ता व ४ टक्के महागाई वाढ भत्ता तातडीने देण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे येत्या शुक्रवारी ७ जुलै रोजी विदर्भस्तरीय धरणे/निदर्शने आंदोलन पुकारले होते. मात्र, आंदोलनापूर्वीच राज्यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ४ टक्के महागाई वाढ भत्ता देण्याची मागणी पूर्ण झाल्याने विमाशि संघाच्या मागणीला यश आले आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे विदर्भातील सर्व जिल्ह्यातील…
Read More