428 Views गोंदिया, दि.27 : ध्वनी प्रदुषण (विनियमन व नियंत्रण) नियम 2000 च्या नियम 5 (3) नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकांचा वापर श्रोतेगृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता श्रीराम जन्मोत्सव निमित्ताने 30 मार्च रोजी दुपारी 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत विहीत ध्वनीमर्यादा राखुन ध्वनीक्षेपकांचा वापर करण्याबाबत खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून याद्वारे सुट जाहीर करण्यात येत आहे (ही सुट शांतता क्षेत्रात लागु राहणार नाही याची दक्षता आयोजकांनी घ्यावी). महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) (3) चे उल्लंघन होणार नाही याची…
Read MoreMonth: March 2023
माजी पालकमंत्री डॉ. फुके यांच्या प्रयत्नांना यश : भंडारा जिल्ह्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत देण्याचे भंडारा जिल्हाधिकारी यांचे आदेश जारी
594 Views भंडारा.(27 मार्च) भंडारा जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अनेक लाभार्थ्यांना घरे मंजूर करण्यात आली असून, त्यामुळे बेघर गरजूंना त्यांच्या स्वप्नातील घरे मिळतील मात्र बांधकामासाठी लागणार्या वाळूच्या किमतीमुळे गोरगरिबांच्या दृष्टीने घरे महाग असल्याने बांधकामात अडथळे येत आहेत. या गंभीर प्रश्नावर अनेक शेतकरी, मजूर व आर्थिक अडचणीत असलेल्या लाभार्थ्यांनी माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या समक्ष आपली समस्या ठेवत वाळूचा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणी भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेऊन ही बाब त्यांच्यासमोर ठेवली व पीएम आवास योजनेतील जिल्ह्यातील लाभार्थ्यांना शासनातर्फे…
Read Moreट्रकच्या धडकेत सहायक फौजदार जागीच ठार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील घटना
445 Views तुमसर /भंडारा प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने भंडारा : दुचाकीने रस्ता ओलांडत असताना ट्रकच्या कचाट्यात सापडल्याने सहायक फौजदाराचा जागीच करुण अंत झाला. राजपूत पिसाराम मते (५६) रा.पोलिस क्वाॅर्टर, भंडारा असे मृत पावलेल्या सहायक फौजदाराचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महामार्गावर त्रिमूर्ती चौकात घडली. राजपूत मते हे लाखनी पोलिस ठाण्यात रायटर म्हणून कार्यरत होते. सुटीचा दिवस असल्याने ते भंडारा येथे आले होते. बाजार करण्याकरिता ते गेले. यावेळी ते दुचाकी क्रमांक एमएच ३६ एएफ ४०८७ ने गेले होते. रस्ता ओलांडत असताना साकोलीकडे जाणाऱ्या ट्रक…
Read Moreगोंदियाच्या मातीत गवतीचहा व सिंट्रोनिलाची लागवड, वर्षाला लाखोंचा नफा…
532 Views कैलास बिसेन यांची प्रयोगशील शेती प्रतिनिधि। गोंदिया। गोंदिया जिल्हा हा धानाचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी धानाचे पीक घेतात. खरीप व रब्बी हंगामात धानाची शेती केल्या जाते. मुळातच धान पिकाला मोठ्या प्रमाणात पाणी लागते. धान शेती पावसावर अवलंबून आहे. निसर्गाच्या बदलत्या चक्रानुसार धान शेती नेहमीच फायदेशीर ठरते असे नाही. त्यामुळे अनेक शेतकरी आपल्या शेतीत नवनवे प्रयोग करत असतात. त्यासाठी कृषी विभागाची मोलाची साथ शेतकऱ्यांना मिळत असते. भाजीपाला, फलोत्पादन, मत्सशेती असे प्रयोग सातत्याने शेतकरी करीत आसतो. त्यामुळे उत्पादनात वाढ होतांना दिसत आहे. प्रयोगशील शेती, गट शेती,…
Read Moreटाटा पॅसेंजरच्या डब्यात चढताना पडून प्रवासी गंभीर; तुमसर रोड येथील घटना
474 Views तुमसर /भंडारा प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने तुमसर (भंडारा) : टाटा पॅसेंजर प्रवासी रेल्वेगाडीत तुमसर रोड रेल्वे स्थानकातून चढताना प्रवाशाचा तोल जाऊन खाली पडला. त्यात त्याचा उजवा हात फ्रॅक्चर होऊन शरीरावर गंभीर जखमा झाल्या. नशीब बलवत्तर म्हणून ते रेल्वे ट्रॅकमध्ये आले नाहीत. ही घटना सकाळी १०:३०च्या सुमारास तुमसर रोड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर घडली. रमेश श्रीवास (५२, सुभाष वॉर्ड, तुमसर रोड) असे या प्रवाशाचे नाव आहे. रमेश श्रीवास हे टाटा पॅसेंजर प्रवासी रेल्वेगाडीने भंडारा रोड येथे जाण्यासाठी तुमसर रोड स्थानकात टाटा पॅसेंजर गाडीत बसताना त्यांचा तोल गेला. त्यामुळे…
Read More