गोंदिया: लम्पी त्वचारोग लसीकरण मोहिमेला सुरूवात- अदानी फाउंडेशन चा पुढाकार

23,378 Viewsसहा गांवामध्ये 1668 जनावरांना लम्पी या रोगाचे लसीकरण करण्यात आले.. प्रतिनिधि। तिरोड़ा। लम्पी या त्वचारोगाचा प्रसार जनावरांमध्ये झपाट्याने होत आहे तसेच हा रोग विषाणूजन्य आजार असल्याने एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला त्याची लागण होते या त्वचारोगांमध्ये जनावरांच्या शरीरावर गाठी गाठी येत असून जनावरांचे आरोग्य धोक्यात येते तसेच चारा कमी खाणे, दुधाळ जनावरांनमध्ये दुधाचे प्रमाण कमी होणे यासारखी विविध लक्षणे दिसून येत असल्याने सध्या पशुपालकांसाठी लम्पी आजार हा चिंतेचा विषय बनलेला आहे. त्यामुळे अदानी फाउंडेशन तिरोडा द्वारा अदानी पावर प्रमुख माननीय श्री कांती बीश्वास यांच्या नेतृत्वात कामधेनू प्रकल्पाअंतर्गत  सहभागी गावांमध्ये लम्पी…

Read More

पडळकरांच्या मुद्द्यावरून फडणवीस आक्रमक; राष्ट्रवादीवर डागली तोफ

42,727 Viewsअमरावती: आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसला आता राजकारण करायचं आहे. त्यासाठीच हा वाद कसा वाढत जाईल यावर राष्ट्रवादीचे नेते भर देत आहेत, असं सांगतानाच आमच्याविरोधात जेव्हा राष्ट्रवादीचे पदाधिकारी खालच्या पातळीवर टीका करत होते. तेव्हा राष्ट्रवादीचे नेते गप्प का होते? खरे तर राष्ट्रवादीला या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज अमरावतीत आले होते. यावेळी त्यांनी अमरावतीतील कोविड सेंटरची पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना गोपीचंद पडळकर यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीवर निशाना साधला. पडळकरांच्या मुद्द्यावर मी आधीच प्रतिक्रिया व्यक्त केली…

Read More

जि.प.पदाधिकार्यांचा कार्यकाळ मुदतवाढीचा सर्वसाधारण सभेत ठराव

52,717 Viewsगोंदिया,दि.29ः- गोंदिया जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत सर्वच पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्यांनी आपला सहा महिन्याचा कार्यकाळ वाढावा यासाठी शासनाकडे मुदतवाढ करण्याचा प्रस्ताव सर्वसमंतीने पारित करुन पाठविण्याचा निर्णय घेतला.मात्र गेल्या काही महिन्यात बांधकाम विभागातील घोटाळे,दुकानगाळे घोटाळ्यासह इतरावंर सर्वच सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या जिल्हापरिषद सदस्यांनी चुप्पी साधल्याने तत्कालीन सेवानिवृत्त अति.मुकाअ व बांधकाम सभापतीनी नियमबाह्य कामाला मुकसमंतीच दिल्याचे दिसून आले.सर्वसाधारण सभेत जिल्हापरिषदांचा शाळा सुरु करण्यापुर्वी निर्जुंतुकीकरण केल्यानंतरच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेत यासाठी आपत्ती निवारण विभागाकडून निधीची मागणी करण्याचा ठराव घेण्यात आला.तर ज्या शाळात अद्यापह नागरिक…

Read More

आज आढळले 11 नवे रूग्ण;क्रियाशील रुग्णांची संख्या आता 21

32,003 Viewsगोंदिया दि.29 (जिमाका) जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. आज नवे तब्बल 11 रुग्ण जिल्ह्यात आढळून आल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.आज आढळून आलेले 9 रुग्ण हे गोंदिया तालुका आणि 2 रुग्ण हे सडक/अर्जुनी तालुक्यातील आहे.आज अकरा रुग्ण नव्याने आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना बधितांची संख्या आता 122 वर पोहचली आहे. गोंदिया येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेकडे 184 अहवाल प्रलंबित आहे.आतापर्यंत 102 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे.जिल्ह्यात आता 21 क्रियाशील रुग्ण आहे.तर एकाचा मृत्यू झालेला आहे.आज आढळलेल्या रुग्णामध्ये गोंदिया तालुक्यातील 9 रुग्ण व सडक/अर्जुनी तालुक्यातील 2 रुग्ण यांचा…

Read More