4,002 Viewsगलवान खोऱयातील संघर्षानंतर चिनी उत्पादने, प्रायोजकांवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत असली तरी बीसीसीआयला आयपीएलचे प्रायोजक व्हिवो कंपनीशी असलेला करार एका झटक्यात तोडून टाकणे शक्य होणार नाही, असे संकेत आहेत. व्हिवो व आयपीएल यांच्यात झालेल्या करारात नमूद असलेले ‘एक्झिट क्लॉज’ व्हिवो कंपनीला पूरक ठरेल व याच तरतुदीमुळे बीसीसीआय हा करार रद्द करु शकणार नाही, असे प्राथमिक चित्र आहे. पूर्व लडाखमध्ये 15 जून रोजी झडलेल्या संघर्षानंतर केंद्र सरकारने चीनच्या 59 ऍपवर बंदी घातली. यात वादग्रस्त टिकटॉक ऍपचा प्राधान्याने समावेश राहिला. त्यानंतर बीसीसीआयने आयपीएल प्रायोजक कंपनी व्हिवोशी असलेल्या करारावर फेरविचार केला…
Read More