भारतीय तटरक्षक दल

47,864 Viewsभारतीय तटरक्षक दलाला यांत्रिक पदांवर योग्य उमेदवारांची भरती करायची आहे. याकरीता इच्छुकांनी आपला अर्ज 22 मार्च 2020 पूर्वी दाखल करायचा आहे. एकूणः 37 जागा पदाचे नावः यांत्रिक 02/2020 बॅच शैक्षणिक पात्रताः 10 वी उत्तीर्ण, 60 टक्के गुणांसह इलेक्ट्रीकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन (रेडिओ/पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा. (एससी, एसटी/खेळाडूः 55 टक्के गुण) शारीरिक पात्रताः उंचीः किमान 157 सेमी. छातीः फुगवून 5 सेमी जास्त. वयाची अटः 18 ते 22 वर्षे (जन्म 1 ऑगस्ट 1998 ते 31 जुलै 2002 च्या दरम्यान झालेला असावा) (इतरांना सवलत) नोकरीचे ठिकाणः संपूर्ण भारत. शुल्कः फी नाही. प्रवेशपत्रः 9 ते…

Read More

जागतिक गुंतवणूकदार आता युपीच्या प्रेमात – पंतप्रधान मोदी

29,527 Viewsजागतिक गुंतवणूकदार आता उत्तर प्रदेशच्या प्रेमात आहेत असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. उत्तर प्रदेशात शांतता नांदू लागल्याने हा बदल घडल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, इटली आणि स्पेन या चार देशांची लोकसंख्या एकत्र केली तर ती २४ कोटींच्या घरात जाते. आपल्या देशात एकट्या उत्तर प्रदेशची लोकसंख्या २४ कोटी आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशचा दबदबा मोठा आहे असंही उदाहरण त्यांनी दिलं. इतकंच नाही तर करोना काळातील लॉकडाउनमध्ये जे मजूर उत्तर प्रदेशात परतले आहेत, त्यांना आता इथलंच सरकार रोजगार उपलब्ध करुन देतं आहे. सुमारे सव्वा कोटी मजुरांना रोजगार…

Read More

सलग १० ते १२ वर्षे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना वगळून महावितरणमध्ये मेगाभरती

782 Viewsपुणे : कंत्राटी पद्धतीने हजारो कामगार सलग १० ते १२ वर्षे काम करत असताना त्यांना बाजूला ठेवून महावितरण कंपनीने ७ हजार पदांवर नोकरभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र कंत्राटी वीज कामगार संघाने याला विरोध केला आहे. या भरतीत आधीच कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना या नोकरभरतीत प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली आहे.२३ जूनला महावितरण कंपनी ७ हजार पदांवर भरती करणार आहे असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केले. त्यात कंत्राटी कामगारांचा उल्लेखही नाही. भारतीय मजदूर संघ या देशातील सर्वात मोठ्या कामगार संघटनेबरोबर संलग्न असलेल्या कंत्राटी कामगार संघाचे राज्य अध्यक्ष नीलेश…

Read More