जर रोगमुक्त भारत करणं हा गुन्हा असेल तर तो गुन्हा मी करणार : बाबा रामदेव

54,969 Viewsगेल्या काही दिवसांपासून योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं तयार केलेल्या कोरोनिल या औषधावरून वाद निर्माण झाले होते. आयुष मंत्रालयानं कोरोनिल या औषधाच्या जाहिरातीवर बंदी घातली होती. तर दुसरीकडे महाराष्ट्र आणि राजस्थानमध्येही या औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर काही ठिकाणी बाबा रामदेव यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज (बुधवार) बाबा रामदेव यांनी कोरोनिलवर स्पष्टीकरण दिलं. दरम्यान, हे औषध अधिक प्रभावी असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. जर रोगमुक्त भारत करणं हा गुन्हा असेल तर मी तो गुन्हा करणार, असंही ते म्हणाले. दरम्यान, आयुष मंत्रालयाला संपूर्ण अहवालही सोपवल्याचं…

Read More

गोव्यात उद्यापासून पर्यटनाला सुरुवात, पण…

32,594 Viewsगोवा म्हणजे पर्यटनाचं केंद्रच! त्यामुळे गोव्यातील समुद्र किनारे आणि पर्यटन स्थळ आणि हॉटेल्स नेहमी देशातील विदेशातील पर्यटकांनी गजबलेल्या असायच्या. पण करोनाच्या विषाणूनं करोना शांत, बंदिस्त होऊन गेला आहे. मार्च महिन्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउननंतर गोव्यातील पर्यटनासाठी दरवाजे बंद झाले. दरम्यानच्या काळात गोवा करोनामुक्तही झाला. पण, प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर करोना पुन्हा गोव्यात दाखल झाला. अखेर या पाठशिवणीच्या खेळानंतर गोव्यातील पर्यटनाचे दरवाजे उद्यापासून खुले होत आहेत. गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगावकर यांनी विषयीची माहिती दिली. एकदा करोनामुक्त होऊनही पुन्हा करोनाविरूद्ध लढा देणाऱ्या गोव्यानं पर्यटन खुल करण्याची घोषणा केली.

Read More