1,738 Views माजी पालकमंत्री डॉ. फुके यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा शासन दरबारी उपस्थित केला होता मुद्दा.. भंडारा/गोंदिया. 16 फेब्रुवारी गतवर्षी 2023 मध्ये भंडारा व गोंदिया जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे व काढणी केलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या संकटात दोन्ही जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनस्तरावर योग्य मोबदला मिळावा, यासाठी मुंबई मंत्रालयात सरकारसमोर महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करून प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली होती. या बैठकीला भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्यासह गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल,…
Read MoreCategory: मराठी बातम्या
गोंदिया सह राज्यात सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय शुरु करण्याच्या निर्णय
851 Views मुंबई। राज्यात जळगांव, लातूर, बारामती, सांगली (मिरज), नंदुरबार व गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय (नर्सिंग महाविद्यालय) सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यात व देशामध्ये होणारा संसर्गजन्य आजाराचा फैलाव विचारात घेऊन परावैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये आमूलाग्र बदल करण्याचे शासनाने ठरविले असून त्यादृष्टीने अशी नर्सिंग महाविद्यालये सुरु करण्यात येत आहे. या 6 शासकीय परिचर्या महाविद्यालयांकरिता पहिल्या चार वर्षांसाठी सुमारे 173 कोटी 88 लाख इतका खर्च करण्यात येईल. तसेच पाचव्या वर्षापासून प्रतिवर्ष सुमारे 13 कोटी 99 लाख इतका निधी देण्यात येईल. नंदुरबार व गोंदिया येथील…
Read Moreगोंदिया-भंडारा जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई द्या- डॉ फुके
545 Viewsगोंदिया/भंडारा (12 फेब्रुवारी) 10-11 फेब्रुवारी रोजी अचानक आलेल्या अवकाळी मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शेतकऱ्यांच्या शेती उत्पादन व शेतीच्या झालेल्या नुकसानीबाबत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन नुकसानीचा तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची मागणी केली आहे.
Read Moreआयुर्वेद जीवनपद्धतीची जोपासना करा-उपराष्ट्रपती जगदीप धनखड
805 Viewsगोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या वास्तूचे भूमिपूजन गोंदिया, दि.11 : देशाच्या अमृत काळात 2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीचे स्वप्न साकारताना सर्वांचे आरोग्य व्यवस्थित राहिले तरच देश परिपूर्णतेने सामर्थ्यशाली होऊ शकेल. यासाठी सर्वांनी आपली जीवनचर्या योग्य पद्धतीने राखून प्रकृतीची काळजी घ्यावी तसेच देशाचा अमूल्य सांस्कृतिक वारसा असलेल्या आयुर्वेद जीवनपद्धतीची जोपासना करावी, असे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज येथे केले. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या वास्तूच्या भूमिपूजन समारंभात उपराष्ट्रपती श्री. धनखड बोलत होते. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार सर्वश्री प्रफुल्ल पटेल, सुनील मेंढे, डॉ. सी.एम. रमेश, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री…
Read Moreमाजी मंत्री डॉ.फुके यांच्या पुढाकाराने आदिवासी गोंड-गोवारी समाजाचे आमरण उपोषण संपले, शासनाने मान्य केल्या मागण्या
1,574 Views नागपूर. (११ फेब्रुवारी) नागपुरातील संविधान चौकात आपल्या मुलभूत समस्यांच्या मागणीसाठी गेल्या 17 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या आदिवासी गोंड गोवारी जमात संवैधानिक संस्था हक्क संघर्ष कृती समितीच्या उपोषणकर्त्यांच्या मागण्या अखेर शासनाने मान्य केल्या असून शासनाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे. आज 11 फेब्रुवारी रोजी माजी मंत्री डॉ.परिणय फुके यांनी सरकारच्या वतीने उपोषणकर्त्यांची भेट घेत उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी पाजून उपोषण संपविले. विशेष म्हणजे नुकतेच माजी मंत्री डॉ.परिणय फुके यांनी नागपूर येथील संविधान चौक येथे उपोषण आंदोलनस्थळी भेट देऊन आदिवासी गोंड-गोवारी समाजाच्या मागण्यांची दखल घेऊन लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट…
Read More