कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत मिळणार; काय आहेत नियम आणि अटी?

1,002 Views  मुंबई : कोरोना (Covid 19) मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून पन्नास हजारांची मदत जाहीर केली आहे.या संदर्भातील जीआर आज राज्य सरकारनं जारी केला आहे. मृतांच्या नाकेवाईकांना 50 हजारांचं सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ही मदत केली जात आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं कोरोना मृतांच्या नातेवाईकांना मदत करावी असे निर्देश दिले होते. अखेर त्यानंतर राज्य सरकारनं मदत जाहीर केली आहे. कोणाला मिळणार मदत? ▶️।राज्यात जी व्यक्ती कोरोनामुळे निधन पावली आहे. त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास 50,000 रुपये इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीमधून देण्यात येणार…

Read More

ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागातील पहिली ते सातवीच्या शाळा येत्या १ डिसेंबरपासून सुरू होणार

736 Views मुंबई। करोना संक्रमणामुळे गेली दीड वर्षाहून अधिक काळ शाळा न पाहिलेल्या चिमुकल्यांना आता शाळेत जाता येणार आहे. पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्यानंतर आता इयत्ता पहिली ते चौथीचे वर्गही ऑफलाइन सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उर्वरित इयत्ता म्हणजे ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागातील पहिली ते सातवीच्या शाळा येत्या १ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्याचा निर्णय मात्र तूर्त ऐच्छिक असणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती केली जाणार नाही. कोविड-१९ संबंधित खबरदारीचे उपाय आणि एसओपी लवकरच जारी करण्यात येतील. मंत्रिमंडळ बैठकीत…

Read More

राज्यातील पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाकडून हिरवा कंदील – राजेश टोपे

741 Views मुंबई : २४ नोव्हेंबर – राज्यातील पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाकडून हिरवा कंदील असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. टास्क फोर्स सोबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चर्चा केली. या चर्चेनंतर राज्यात पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग सुरू करावेत. मात्र शाळा सुरू करताना गुगली नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याबाबत दक्षता ठेवावी लागेल. अशा सूचना टास्क फोर्स कडूनही करण्यात आले आहेत. मात्र याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अंतिम निर्णय घेतील असेही प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच 12 ते 18 वयोगटातील मुलांना…

Read More

गोंदिया: जिल्ह्यातील उद्या 24नोव्हेंबरपासून धान खरेदी केंद्र सुरू, खा.प्रफुल्ल पटेल यांच्या सुचनांचे पालन

715 Views  गोंदिया : १ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र अनेक अडचणींना समोर करून केंद्रावर खरेदी सुरू करण्यात आली नव्हती. यामुळे शेतकर्‍यांच्या अडचणी वाढत चालल्या होत्या. शेतकर्‍यांचे हित संबंध जोपासत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले. यानुरूप उद्या २४ नोव्हेंबरपासून केंद्रावर धान खरेदी होणार आहे. या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे शेतमाल विक्रीची समस्या मार्गी लागणार आहे. गोंदिया व भंडारा जिल्ह्यात मार्वेâटिंग फेडरेशन तसेच आदिवासी विकास महामंडळ या दोन प्रमुख एजेंसीच्या नियंत्रणाखाली अभिकर्ता संस्थांच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. दिवाळीपूर्वी शेतमाल…

Read More

जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्‍वासनानंतर मोरवाही वाशीयांचे आंदोलन मागे, दोषीवर होणार कारवाई

550 Views  प्रतिनिधि। गोंदिया( ता.2) तालुक्यातील मोरवाही येथील बुद्ध विहार बांधकाम प्रकरणी मागच्या चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू होते. या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी दोषी व्यक्तींवर कारवाईचे लेखी आदेश दिल्यानंतरच सोमवारी ( ता.1) रात्री उशिरा आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा समितीतर्फे करण्यात आली. समितीने आंदोलन मागे घेतल्यामुळे प्रशासनानेही सुटकेचा श्वास घेतला आहे. मोरवाही येथील विनापरवानगी बुद्ध विहार तोडणाऱ्यांना तसेच मागच्या दोन वर्षापासून बुद्ध विहाराचे बांधकाम ताटकळत ठेवणाऱ्या दोषी सरपंच, ग्रामसेवक, जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कनिष्ठ,उप अभियंता व बांधकाम कंत्राटदारांवर कारवाईच्या मागणीसाठी मागच्या ऑगस्ट महिन्यात येथील बौद्ध समाज बांधवाना…

Read More