गोंदिया: 27 एप्रिल ते 11 मे पर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश लागू

2,352 Views       गोंदिया,दि.26 : जिल्ह्यात 27 एप्रिल ते 11 मे 2023 या कालावधीत विविध पक्ष व संघटनांकडून त्यांच्या प्रलंबीत मागण्यासंदर्भाने उपोषणे, धरणे, मोर्चे, रास्तो रोको, जेल भरो व संप इत्यादी आंदोलने आयोजित केली जात आहेत. दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिन व 5 मे रोजी बुध्द पौर्णिमा असे सण/उत्सव साजरे करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी गोंदिया यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराअंतर्गत दिनांक 27 एप्रिल पासून ते 11 मे 2023 पर्यंत सन 1951 च्या मुंबई पोलीस अधिनियमाची कलम 37 (1) (3) चे मनाई आदेश…

Read More

गोंदिया: दुर्गम मुरकूटडोह मध्ये प्रथमच पोचले प्रशासन, विविध योजनांचा दिला लाभ..

599 Views उपविभागीय अधिकारी अनमोल सागर यांचा पुढाकार, पोलीस विभागाचे मोलाचे सहकार्य            गोंदिया,दि.26  (जिमाका) : महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड सीमेवर असलेल्या अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील मुरकुटडोह येथील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी उपविभागीय अधिकारी अनमोल सागर यांच्या पुढाकाराने अख्खे प्रशासन प्रथमच गावात गेले आणि योजनांचा लाभ दिला. अनेक विभागाचे अधिकारी गावात पाहून नागरिकही भारावून गेले होते. एक दिवसीय शिबिराच्या निमित्ताने गावकरी व प्रशासनामध्ये विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे.          देवरीचे उपविभागीय अधिकारी अनमोल सागर यांच्या संकल्पनेतून महसुल प्रशासन तर्फे तहसील कार्यालय, आधार सेंटर सालेकसा, पंचायत समिती, तलाठी कार्यालय, कृषी कार्यालय, सालेकसा ग्रामपंचायत, दररेकसा, जमाकुडो, आणि गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त…

Read More

सामाजिक न्याय पर्व निमित्ताने नंगपुरा/मुर्री येथे स्वच्छता अभियान

491 Views गोंदिया, दि.20 : प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण पुणे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्यात 1 एप्रिल  ते 1 मे 2023 या कालावधीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत “सामाजिक न्याय पर्व”चे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने 19 एप्रिल 2023 रोजी विनोद मोहतुरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत नंगपुरा/मुर्री व अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपुरा/मुर्री परिसरात स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कविता लिचडे, सरपंच ग्रामपंचायत नंगपुरा/मुर्री,  अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपुरा/मुर्री शाळेचे मुख्याध्यापक रविशंकर इठुले, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय गोंदियाचे सर्व कर्मचारी, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी…

Read More

गोंदिया: डॉ.मंगला कटरे अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित..

1,190 Views  गोंदिया – येथील राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मंगला कटरे यांना नुकतेच जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार महिला व बालविकासाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या महिलां व संस्थांच्या पाठीवर कौतुकाची थाप पाडावी व त्यांच्या कामाला राजमान्यता मिळावी या उदात्त हेतुने शासनाच्या वतीने अहिल्यादेवी होळकर हा पुरस्कार देण्यात येतो. डॉ.मंगला कटरे यांनी मागील अनेक वर्षापासून समाजकार्य क्षेत्रात विविध समाजोपयोगी कार्य करीत आहेत.त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेवून महाराष्ट्र शासनाने हा पुरस्कार देवून गौरव केला. गोंदिया येथे आयोजित भव्य कृषी महोत्सवामध्ये जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे…

Read More

माजी पालकमंत्री डॉ. फुके यांच्या प्रयत्नांना यश : भंडारा जिल्ह्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत देण्याचे भंडारा जिल्हाधिकारी यांचे आदेश जारी

755 Views  भंडारा.(27 मार्च) भंडारा जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अनेक लाभार्थ्यांना घरे मंजूर करण्यात आली असून, त्यामुळे बेघर गरजूंना त्यांच्या स्वप्नातील घरे मिळतील मात्र बांधकामासाठी लागणार्‍या वाळूच्या किमतीमुळे गोरगरिबांच्या दृष्टीने घरे महाग असल्याने बांधकामात अडथळे येत आहेत. या गंभीर प्रश्नावर अनेक शेतकरी, मजूर व आर्थिक अडचणीत असलेल्या लाभार्थ्यांनी माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या समक्ष आपली समस्या ठेवत वाळूचा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणी भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेऊन ही बाब त्यांच्यासमोर ठेवली व पीएम आवास योजनेतील जिल्ह्यातील लाभार्थ्यांना शासनातर्फे…

Read More