भंडारा: जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे जुन महिन्यात आयोजन

338 Views  प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने भंडारा, दि. 16 मे : नेहरू युवा केंद्राद्वारे आझादी का अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे आयोजन जुन महिन्यात करण्यात यणार आहे. स्वातंत्र्य संग्रामातील देशभक्तीची भावना वृंदगीत करणे आणि तरूण युवक कलावंतांना व्यासपीठ निर्माण करून देण्याच्या उद्देशाने चित्रकला, कविता लेखन, छायाचित्र, भाषण स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम व जिल्हा युवा संमेलन ‘भारत@2047’ युवा संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना स्पर्धकांना रोख बक्षीस स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. चित्रकला, कविता लेखन व छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम रूपये 1 हजार, द्वितीय रूपये…

Read More

बाजार समिती निवडणूक; भंडाऱ्यात ९६.५७ तर लाखनीत ९८.३६ टक्के मतदान

307 Views  प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने भंडारा: जिल्ह्यात भंडारा व लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारला मतदान पार पडले. भंडाऱ्यात १९५५ मतदारांपैकी प्रत्यक्ष १८८८ मतदान झाले, मतदानाची टक्केवारी ९६.५७ राहीली. लाखनीत २७४५ मतदारांपैकी प्रत्यक्ष २७०० मतदारांनी मतदान केले. टक्केवारी ९८.३६ राहीली. शनिवारला निकाल घोषीत होणार असून काँग्रेस समर्थीत पॅनल विरुदध राष्ट्रवादी- भाजपा, शिंदे गट समर्थीत पॅनल प्रमुखांनी विजयाचे दावे केले आहेत. भंडारा व लाखनी येथे काँग्रेस विरुदध राष्ट्रवादी समर्थीत पॅनलमध्ये अत्यंत काट्याच्या लढती झाल्या. भंडारा येथील बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी, भाजपा व शिंदे गट मैदानात होता. काँग्रेस पॅनलचे…

Read More

गोंदिया: जिल्ह्यात 2 मे पर्यंत ‘येलो अलर्ट’, शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन..

1,474 Views  गोंदिया,दि. 26 : जिल्ह्यात पाऊस, वादळी वारा, गारपीट व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे. जिल्ह्यामध्ये 2 मे पर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे. या अनुषंगाने नागरिकांनी विषेशत: शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. शेतात कामाला जात असताना अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. वीज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. पाऊस व वीज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये व…

Read More

गोंदिया: 27 एप्रिल ते 11 मे पर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश लागू

2,187 Views       गोंदिया,दि.26 : जिल्ह्यात 27 एप्रिल ते 11 मे 2023 या कालावधीत विविध पक्ष व संघटनांकडून त्यांच्या प्रलंबीत मागण्यासंदर्भाने उपोषणे, धरणे, मोर्चे, रास्तो रोको, जेल भरो व संप इत्यादी आंदोलने आयोजित केली जात आहेत. दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिन व 5 मे रोजी बुध्द पौर्णिमा असे सण/उत्सव साजरे करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी गोंदिया यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराअंतर्गत दिनांक 27 एप्रिल पासून ते 11 मे 2023 पर्यंत सन 1951 च्या मुंबई पोलीस अधिनियमाची कलम 37 (1) (3) चे मनाई आदेश…

Read More

गोंदिया: दुर्गम मुरकूटडोह मध्ये प्रथमच पोचले प्रशासन, विविध योजनांचा दिला लाभ..

423 Views उपविभागीय अधिकारी अनमोल सागर यांचा पुढाकार, पोलीस विभागाचे मोलाचे सहकार्य            गोंदिया,दि.26  (जिमाका) : महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड सीमेवर असलेल्या अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील मुरकुटडोह येथील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी उपविभागीय अधिकारी अनमोल सागर यांच्या पुढाकाराने अख्खे प्रशासन प्रथमच गावात गेले आणि योजनांचा लाभ दिला. अनेक विभागाचे अधिकारी गावात पाहून नागरिकही भारावून गेले होते. एक दिवसीय शिबिराच्या निमित्ताने गावकरी व प्रशासनामध्ये विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे.          देवरीचे उपविभागीय अधिकारी अनमोल सागर यांच्या संकल्पनेतून महसुल प्रशासन तर्फे तहसील कार्यालय, आधार सेंटर सालेकसा, पंचायत समिती, तलाठी कार्यालय, कृषी कार्यालय, सालेकसा ग्रामपंचायत, दररेकसा, जमाकुडो, आणि गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त…

Read More