समृद्धि महामार्ग अपघात: नोकरीसाठी पुण्याला निघालेल्या अवंतीवर काळ कोपला..

846 Views वर्धा : बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावर मध्यरात्री खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात बस उलटून डिझेल टँक फुटल्याने बसला आग लागली आणि झोपेतच २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात अनेकांनी आपली मुलं, नातेवाईक गमावली, तर काहींचं अख्खं कुटुंब गेलं. यापैकीच अवंती पोहनीकर ही तरुणी देखील होती. अवंतीचा या अपघातात होरपळून मृत्यू झाला. तिच्या अशा अकाली जाण्याने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अवंती पोहनीकर ही वर्ध्याची असून ती इंजिनीअर होती. पुण्याला जाण्यासाठई शुक्रवारी सायंकाळच्या खासगी ट्रॅव्हल्सने ती निघाली होती. परंतु मध्यरात्री बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर झालेल्या…

Read More

समृद्धि महामार्ग अपघात: मृतांची ओळख पटविण्यात अडचण, सामूहिक अंत्यसंस्काराचा निर्णय..

557 Views  बुलढाणा: समृद्धी महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री बुलढाण्यात खाजगी ट्रॅव्हल्सला झालेल्या भीषण अपघातात 26 प्रवाशांच्या होरपळून मृत्यू झाला. यात वर्ध्यातील 14 लोकांचा समावेश होता. या सर्वांवर रविवारी बुलढाण्यात सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह मोठ्या प्रमाणात भाजले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख पटविण्यात अडचण येत आहे. त्यामुळे मृतांच्या कुटुंबियांशी चर्चा करून रविवारी बुलढाण्यात त्यांच्यावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुलढाणा येथे गेलेले वर्ध्याचे तहसीलदार रमेश कोळपे यांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे. या अपघाताची माहिती मिळताच ट्रॅव्हल्समध्ये असलेल्या प्रवाशांचे नातेवाईक आधीच बुलढाणा येते…

Read More

‘विमाशि संघा’च्या आंदोलनापूर्वीच एक मागणी पूर्ण राज्‍यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मिळणार ४ टक्‍के महागाई वाढ भत्ता

396 Views  विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे शुक्रवार ७ जुलै २०२३ ला धरणे/निदर्शने आंदोलन गोंदिया : राज्यातील खासगी अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्था खासगी अनुदानित आश्रमशाळेत कार्यरत शिक्षक – शिक्षकेतर व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा थकबाकी हप्ता व ४ टक्के महागाई वाढ भत्ता तातडीने देण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे येत्‍या शुक्रवारी ७ जुलै रोजी विदर्भस्तरीय धरणे/निदर्शने आंदोलन पुकारले होते. मात्र, आंदोलनापूर्वीच राज्‍यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ४ टक्‍के महागाई वाढ भत्ता देण्याची मागणी पूर्ण झाल्‍याने विमाशि संघाच्या मागणीला यश आले आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे विदर्भातील सर्व जिल्ह्यातील…

Read More

मंत्रिमंडल निर्णय: संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात वाढ

695 Views             मुंबई। संजय गांधी निराधार अनुदान योजनेत आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेत दरमहा पाचशे रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.             या दोन्ही योजनांत सध्या एक हजार रुपये इतके मासिक अर्थसहाय्य करण्यात येते. आता त्यात पाचशे रुपये वाढ झाल्याने ते दिड हजार रुपये इतके होईल. एक अपत्य असलेल्या विधवा लाभार्थींना सध्या १ हजार १०० तर दोन अपत्ये असलेल्या लाभार्थींना १ हजार २०० इतके मासिक अर्थसहाय्य देण्यात येते. यात अनुक्रमे ४०० रुपये व ३००…

Read More

महात्मा जोतिराव फुले, आयुष्मान भारत आरोग्य योजनेचे एकत्रिकरण,आता दीड लाखांऐवजी ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण

424 Views मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला निर्णय.. मुंबई। राज्यातील महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना आणि केंद्राची आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण करून, यात नागरिकांना आरोग्य संरक्षण ५ लाख रुपये एवढे करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत दिड लाखांपर्यंत उपचाराची खर्च मर्यादा आहे. सुमारे २ कोटी कार्डसचे वाटप करण्यात येणार असून, रुग्णालयांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे.             या जन आरोग्य योजनेत सध्या मूत्रपिंड शस्त्रकियेसाठी असलेली अडीच लाख रुपयांची उपचार खर्चाची मर्यादा वाढवून ती साडे…

Read More