महाराष्ट्रात आतापर्यंत कोविडसंदर्भात 1 लाख 41 हजार गुन्हे दाखल : अनिल देशमुख

3,756 Viewsमहाराष्ट्रात लॉक डाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भात कलम 188 नुसार 1 लाख 41हजार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी दिली. ते म्हणाले, महाराष्ट्रात लॉक डाऊनच्या सुरुवातीपासून म्हणजेच 22 मार्च ते 2जुलै या 1,41,258 गुन्ह्यांची नोंद झाली असून 29,559 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच विविध गुन्ह्यांसाठी 12 कोटी 25 लाख 11 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तर अत्यावश्यक सेवेसाठी 5 लाख 48 हजार 005 पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. पुढे ते म्हणाले, लॉक डाऊनच्या काळात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 292 घटना घडल्या. यामध्ये…

Read More

पडळकरांच्या मुद्द्यावरून फडणवीस आक्रमक; राष्ट्रवादीवर डागली तोफ

922 Viewsअमरावती: आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसला आता राजकारण करायचं आहे. त्यासाठीच हा वाद कसा वाढत जाईल यावर राष्ट्रवादीचे नेते भर देत आहेत, असं सांगतानाच आमच्याविरोधात जेव्हा राष्ट्रवादीचे पदाधिकारी खालच्या पातळीवर टीका करत होते. तेव्हा राष्ट्रवादीचे नेते गप्प का होते? खरे तर राष्ट्रवादीला या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज अमरावतीत आले होते. यावेळी त्यांनी अमरावतीतील कोविड सेंटरची पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना गोपीचंद पडळकर यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीवर निशाना साधला. पडळकरांच्या मुद्द्यावर मी आधीच प्रतिक्रिया व्यक्त केली…

Read More

जागतिक गुंतवणूकदार आता युपीच्या प्रेमात – पंतप्रधान मोदी

30,251 Viewsजागतिक गुंतवणूकदार आता उत्तर प्रदेशच्या प्रेमात आहेत असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. उत्तर प्रदेशात शांतता नांदू लागल्याने हा बदल घडल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, इटली आणि स्पेन या चार देशांची लोकसंख्या एकत्र केली तर ती २४ कोटींच्या घरात जाते. आपल्या देशात एकट्या उत्तर प्रदेशची लोकसंख्या २४ कोटी आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशचा दबदबा मोठा आहे असंही उदाहरण त्यांनी दिलं. इतकंच नाही तर करोना काळातील लॉकडाउनमध्ये जे मजूर उत्तर प्रदेशात परतले आहेत, त्यांना आता इथलंच सरकार रोजगार उपलब्ध करुन देतं आहे. सुमारे सव्वा कोटी मजुरांना रोजगार…

Read More

आज कृषि दिन…! महाराष्ट्रात 1 जुलैला का साजरा केला जातो हा दिवस

15,446 Viewsमुंबई : हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून त्यांची जयंती महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरी केली जाते. महाराष्ट्र शासनाने कृषि दिन हा 1 जुलै रोजी वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त घोषित केला आहे. राज्यभर हा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जातो. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांचा जन्मदिन (1 जुलै) ‘महाराष्ट्र कृषी दिन’ (Maharashtra Krishi Din) म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मदिनी महाराष्ट्रात कृषी दिन साजरा…

Read More

किती दिवस धान्य पुरवणार? लॉकडाऊन काढला नाही तर लोक गप्प बसणार नाहीत; उदयनराजे यांचा केंद्राला सल्ला

2,711 Viewsसातारा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. यावर माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी टीका केलीय. लॉकडाऊन कधी उठणार? लॉकडाऊन काढला नाही तर लोक गप्प बसणार नाही, किती दिवस अन्यधान्य पुरवणार? असा सल्लाही उदयनराजे भोसले यांनी केंद्राला दिलाय. त्यामुळे केंद्र आणि राज्यांनी एकत्र येऊन चर्चा करुन लॉकडाऊन उठवण्याविषयी निर्णय घ्यावा, असंही ते म्हणाले. लॉकडाऊनमुळे लाखो लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे लॉकडाऊन किती दिवस वाढवणार? असा प्रश्न माजी खासदार उदयनराजे यांनी राज्यासह केंद्राला विचारला आहे. माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आज एबीपी माझाशी संवाद साधला.…

Read More