माजी पालकमंत्री डॉ. फुके यांच्या एका फोन वरुन चपराड, सोनी, सावंगी, आमगाव येथील विद्यार्थ्यांनी मिळाले सर्व बसेसचे थांबे..

381 Views

 

लाखांदुर दौऱ्यात विद्यार्थ्यांनी बसेस न थांबवण्याची सांगितली होती व्यथा..

 

भंडारा. ऑगस्ट 01
31 जुलै रोजी लाखांदूर तहसीलच्या दहेगाव येथे नियोजित दौऱ्यात अनेक शालेय विद्यार्थ्यांनी माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांनी लाखांदूर-वडसा मार्गावर राज्य परिवहन विभागाच्या सामान्य बस आणि सुपर बसेसना थांबा न देणे आणि नियमित थांबे नसणे याबाबत डॉ. फुके यांनी व्यथा सुनावली.

या भेटित विद्यार्थ्यांनी माजी पालकमंत्री डॉ.फुके यांना सांगितले की, लाखांदूर-वडसा रस्त्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या नियमित व जलद गति बसेससाठी स्टापेज नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजला जाण्यास विलंब होतो. सुपर बसला चपराड, सोनी, सावंगी आणि आमगाव येथे थांबे नाहीत. सुपर बसेससह सर्व सामान्य बसेसमध्ये विद्यार्थ्यांना चढण्याची आणि उतरण्याची व्यवस्था असल्यास विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.

विद्यार्थ्यांच्या सर्व समस्यांची दखल घेत माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी तत्काळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा प्रशासकीय संचालक शेखर चन्ने व भंडारा बस डेपोचे प्रशासक यांना फोन करून विद्यार्थ्यांच्या समस्यांची माहिती दिली. आणि लाखांदूर-वडसा सड़क मार्गवर सर्व बसेस आणि जलद गति बसना चप्राड, सोनी, सावंगी आणि आमगाव येथील प्रवासी थांब्यावर थांबण्याचे निर्देश देण्यात आले.

या सूचनेवर काल भंडारा व साकोली बस डेपोच्या व्यवस्थापकांना डॉ. फुके यांनी कळवल्यानंतर आज दि.1 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा बस आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन लाखांदूर-वडसा मार्गावरील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सर्व सामान्य बसेससह, लाखांदूर-वडसा मार्गावर धावणाऱ्या भंडारा-गडचिरोली, साकोली-राजुरा आणि साकोली-चंद्रपूर एक्स्प्रेसच्या चालक आणि वाहकांना चापराड, सोनी, सावंगी आणि आमगाव येथे चढण्यासाठी/उतरण्यासाठी थांबे देण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या.

या समस्याच्या तोड़गा काळण्यासाठी आणि सुपरसह सर्व बसेसचा थांबा मिळाल्याबद्दल व समस्या सोडविल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी डॉ.परिणय फुके यांचा आभार व्यक्त केले.

Related posts