गोंदिया: महापुरुषांचा अपमान करणाऱ्या मनोहर भिडे याला अटक करा, उद्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी च्या वतीने जाहिर निषेध..

371 Views

 

गोंदिया। गोंदिया जिल्हा ओबीसी सेल राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी च्या वतीने दि. 02/08/2023 बुधवार ला महापुरुषांचा अपमान करणाऱ्या मनोहर भिडे याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी या मागणीसह निषेध व्यक्त करून जिल्हाधिकारी गोंदिया मार्फत ना.मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना निवेदन देण्यात येणार आहे.

एका खाजगी कार्यक्रमात मनोहर भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी, तसेच महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचं तिव्र जाहिर निषेध माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी, ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकर दोनोडे, राजलक्ष्मी तुरकर, यशवंत गणवीर, सुरेश हर्षे, पूजा अखिलेश सेठ, अविनाश जायस्वाल, रफिक खान, मनोज डोंगरे, योगेंद्र भगत, केतन तुरकर, गणेश बरडे, अजय गौर, मोहन पटले व सर्व सेल व आघाड्याचे जिल्हाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर निषेध व आंदोलन करण्यात येणार आहे.

तरी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी चे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपंचायत सदस्य, सर्व तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, सर्व सेल चे अध्यक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते, यांना कळविण्यात येते की दि. 02/08/2023 बुधवार ला सकाळी ठीक: 11.30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली कार्यालय, गोंदिया येथे न चुकता उपस्थित राहावे, हि विंनती.

Related posts