299 Views
गोंदिया-ग्रामपंचायत ईरी येथे कार्यरत ग्रामपंचायत कर्मचारी रमेश नान्हु ठकरेले यांनी दि.31 मे रोजी ग्रामपंचायत परिसरात सरपंच, उपसरपंच, माजी प्र.सरपंच व ग्रामसेवक यांच्या जाचाला कंटाळून विष प्राषण केले व त्यांचे दि.1 जुनला गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालय निधन झाले. या दुखद घटनेच्या सुरूवाती पासुनच महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष मिलिंद गनविर ,जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र कटरे, तालुका सचिव विनोद शहारे, सुनिल लिल्हारे सह महासंघाचे कार्यकर्ते कर्मचाऱ्यांस न्याय मिड़वुण देण्यास सक्रीय झाले.
पोलिस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, बिडीओ व संबंधिताना शिष्टमण्डलाचे वतीने निवेदन देवून दोषीनां त्वरित अटक करणे, संपुर्ण वेतन थकबाकी अदा करणे, ग्रामसेवकाला निलंबित करणे, ईत्यादी न्याय मागण्यांना घेवून जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे काम बंद करण्याची सुचना दिली. दुर्दैवाने 1 जुनला या कर्मचा-यांचे निधन झाले व पोलिस विभागाने वरिल 4 ही लोकांवर भा.द संहिता 306,504,506 व 34 अन्वये गुन्हा दाखल करूण 1 आरोपीला अटक केले.
बाकी आरोपीनां त्वरित अटक करण्याची, मृतकाचे वारसाला त्वरित नोकरी देणे,मागील २०१७ पासून कर्मचाऱ्यांचा पगार भत्ते निर्वाह निधीचा हिशोब न करणे. २७ महिन्याचे पगार हेतू पुरस्सर न देणे. वेतन मगितल्यावर कामावरून बंद करण्याची धमकी देणे. सह अनेक प्रकारे मानसिक व आर्थिक रित्या प्रताड़ित करीत होते त्यामुळे त्यांच्या जाचाला कंटाळून कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. व त्यासाठी ग्रामपंचायत व पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे अधिकारी ज्यांचेवर कर्मचा-यांच्या सेवाशर्तीच्या अंमलबजावणीची जबाबदारी आहे ते तेवढ़ेच जबाबदार असल्याचे आरोप मिलिंद गनविर यांनी केला आहे.
कुटुंबातील वारसान तत्वावर त्वरित नोकरी देणे, कर्मचाऱ्यांचा सर्व थकीत वेतन व भत्ता व भविष्य निर्वाह निधी ची संपूर्ण रक्कम अदा करणे, मयत कुटुंबाला योग्य मोबदला आरोपीनां तात्काळ अटक करण्यात यावी तसेच आरोपी सरपंच उपसरपंच यांना पदावरून बड़तर्फ करण्याच्या मागणीचे निवेदन ईर्री येथे कर्मचाऱ्यांचे अंत्यसंस्कार पुर्वी झालेल्या गावक-यांच्या सभेत बिडीओ यांना सादर करण्यात आले.
या प्रसंगी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष मिलिंद गनविर, जिल्हाध्यक्ष चत्रुगण लांजेवार जिल्हा कार्याध्यक्ष महेन्द्र कटरे , बुधराम बोपचे, विनोद शहारे, आनंद बागड़े, देवेंद्र मेश्राम ,सुनिल लिल्हारे, सह जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी ईरी येथे उपस्थित होते.