गोंदिया, दि.3 :- शासकीय आधारभुत धान खरेदी योजने अंतर्गत रब्बी पणन हंगाम 2022-23 मधील धान खरेदीकरीता दिनांक 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत NEML पोर्टलवर सर्व शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण करण्याकरीता शासनाकडून मुदतवाढ देण्यात आलेली होती. परंतू सदर कालावधीत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण न झाल्यामुळे काही शेतकरी नोंदणी पासून वंचित राहिलेले होते. त्या अनुषंगाने शासन पत्रान्वये NEML पोर्टलवर सर्व शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता शासनाकडून दिनांक 15 मे 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी जे शेतकरी NEML पोर्टलवर नोंदणी पासून वंचित आहेत त्यांनी नजिकच्या शासकीय आधारभुत धान खरेदी केंद्रावर स्वत:चे चालु हंगामाचे सातबारा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक व मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे सादर करुन 15 मे पर्यंत शेतकरी नोंदणी करावी व शासनाच्या धान खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी व्हि.एस. इंगळे यांनी केले आहे.
गोंदिया: धान खरेदी योजनेंतर्गत ऑनलाईन नोंदणीकरीता 15 मे पर्यंत मुदतवाढ
1,260 Views