बीआरएस महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघात किसान रथ सुरू करणार, अबकी बार किसान सरकार नारा घुमणार महाराष्ट्रात..

281 Views

 

तुमसर प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने

तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी जो सर्वांगिण विकास केला आहे.तसेच शेतकऱ्यांसाठी भरीव असे काम सुरू आहे.आता बीआरएस पक्षाने महाराष्ट्र मध्ये लक्ष देण्याची सुरुवात केली आहे.शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी . बीआर के.एस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम व राज्य समन्वयक शेतकरी नेते दशरथ काका सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भारत राष्ट्र किसान समितीच्या माध्यमातून अबकी बार किसन सरकार नारा घुमणार महाराष्ट्रात हा नारा देत महाराष्ट्रातील सर्व २८८ मतदारसंघामध्ये २८८ किसान रथ सुरू करणार आहे अशी माहिती भारत राष्ट्र समिती चे चरण वाघमारे यांनी दिली आहे.
यासंदर्भात बीआरएस च्या सर्व संबंधित पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासाठी ८ व ९ मे रोजी हैदराबाद येथे प्रशिक्षण आयोजत केले आहे.१० मे पासून किसान रॅली महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात व हर घर भारत राष्ट्र किसान समिती प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात बी आर एस पार्टीचे ध्येय धोरण शेतकऱ्यांसाठीच्या योजना आणि इतरही कल्याणकारी योजना पोहोचवण्यासाठीचा प्रयत्न करायचा आहे त्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

अबकी बार किसान सरकार नारा देत १० मे पासून काही जवळच्या जिल्ह्यातील काही वाहने शिवनेरीवरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर नतमस्तक होऊन तर काही विदर्भातून नागपूर येथून दीक्षाभूमी याठिकाणीहून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सुरुवात करतील तर उर्वरित वाहने इतर जिल्ह्यातील व तालुक्यातील वाहने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून या रॅलीला सुरुवात करतील तरी महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरातील शेतकऱ्यांनी या किसान रॅली मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन माजी आमदार तथा भारत राष्ट्र समितीचे चरण वाघमारे यांनी केले आहे.

Related posts