जिल्ह्यातील 9 कृषि केंद्राचे परवाने रद्द व 10 कृषि केंद्राचे परवाने निलंबित..सहा कृषि केंद्रांना सक्त ताकीद..

864 Views

         गोंदिया,दि.29 : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार महाराष्ट्र राज्यात 1 नोव्हेंबर 2017 पासून अनुदानित खते विक्रीसाठी थेट लाभ हस्तांतरण योजना सुरु करण्यात आली आहे. खरीप हंगामात टॉप-20 युरिया बायर खरेदीदार गैरप्रकारा संदर्भात जिल्ह्यातील श्रीनाथ कृषि केंद्र ठाणा ता.आमगाव, विनायक फर्टिलायजर कामठा ता.गोंदिया, श्याम कृषि केंद्र एकोडी ता.गोंदिया या तीन कृषि केंद्राचे परवाने तीन महिण्याकरीता निलंबीत करण्यात आले आहे.

         सम्यक कृषि केंद्र सोनबिहारी ता.गोंदिया, जय किसान कृषि केंद्र बनाथर ता.गोंदिया, हिंदूस्थान ॲग्री क्लिनिक कुडवा ता.गोंदिया, अंश कृषि केंद्र चुटिया ता.गोंदिया, केवलराम कृषि केंद्र चुटिया ता.गोंदिया, सेंट्रल कृषक सहकारी संस्था कटंगी ता.गोंदिया, श्री गणेश कृषि केंद्र पांढराबोडी ता.गोंदिया या सात कृषि केंद्राचे परवाने 15 दिवसाकरीता निलंबीत करण्यात आले आहे.

        मालती कृषि केंद्र बाम्हणी ता.सालेकसा, राजेंद्र उपराडे कृषि केंद्र दशरथटोला बाम्हणी ता.सालेकसा, नागपुरे कृषि केंद्र पठानटोला ता.सालेकसा या तीन कृषि केंद्राची पुनश्च: सुनावणी 29 जून रोजी लावण्यात आली आहे. तसेच कृषि केंद्राचे परवाने घेऊन सुध्दा आजपावेतो कृषि केंद्र सुरु न केल्यामुळे व व्यवहार न केल्यामुळे 9 कृषि केंद्राचे परवाने रद्द करण्यात येत आहे.

        खरीप हंगाम 2022 मध्ये शेतकऱ्यांना योग्य दर्जाचे बियाणे व रासायनिक खते मिळण्याकरीता जिल्ह्यातील कृषि निविष्ठा विक्री केंद्राची तपासणी करण्याची कार्यवाही जिल्ह्यातील निरीक्षकांमार्फत करण्यात आलेली आहे. त्यानुसार श्री कृषि केंद्र सलंगटोला ता.सालेकसा, किसान कृषि केंद्र चिकित्सालय साखरीटोला ता.सालेकसा, राऊत कृषि कृषि केंद्र साखरीटोला ता.सालेकसा, ओम साई कृषि केंद्र मुंडीपार ता.गोरेगाव, शेतकरी कृषि सेवा केंद्र ता.सडक अर्जुनी, मानकर कृषि सेवा केंद्र देऊटोला ता.गोरेगाव या सहा कृषि केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.

        खताची साठेबाजी करणे, खतांचा काळाबाजार करणे किंवा अनुदानित खत परराज्यात विक्री करणे इत्यादी प्रकार निदर्शनास आल्यास संबंधीत विक्रेत्यांचा परवाना किटकनाशक कायदा 1968 व खत नियंत्रण आदेश 1983 तसेच बियाणे कायदा 1966 अंतर्गत निलंबीत करुन कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हिंदूराव चव्हाण यांनी कळविले आहे.

Related posts