प्रतिनिधि। 25 जानेवारी
गोंदिया- प्रजासत्ताक दिनाचा मुख्य ध्वजारोहण समारोह २६ जानेवारी २०२२ रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय कारंजा-गोंदिया येथे सकाळी ०९.१५ वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
कोरोनाचा प्रोटोकॉल सांभाळून हा कार्यक्रम पार पडणार आहे. जिल्हाधिकारी नयना गुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे व मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
राज्यमंत्री श्री. बनसोडे यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. २५ जानेवारी २०२२ रोजी शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे आगमन व मुक्काम. सकाळी ०९.०५ वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथून पोलीस मुख्यालय कारंजाकडे प्रयाण, सकाळी ०९.१५ वाजता प्रजासत्ताक दिनाच्या ७२ वा वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण पोलीस मुख्यालय गोंदिया. ०९.१८ ते ०९.२५ उपस्थितांना संदेश, ०९.२६ ते ०९.५४ सत्कार व बक्षीस वितरण, ०९.५५ ते ०९.५९ उपस्थित मान्यवरांच्या भेटी, सकाळी १० वाजता शासकीय विश्रामगृह गोंदियाकडे प्रयाण व राखीव आणि सोईनुसार नागपूरकडे प्रयाण.