क्षेत्राला सुजलाम – सुफलाम करणे हेच माझे ध्येय – खा.प्रफुल पटेल

1,340 Views

खा.प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा संपन्न..

भंडारा। भंडारा व गोंदिया क्षेत्रातील शेतीला सिंचित करून या परिसराला सुजलाम सुफलाम करण्याचे माझे स्वप्न आहे हे स्वप्न पूर्ण करीनच असे ठाम उद्दगार आज नॅचरल ग्रोवर्स प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखाना परिसर लाखांदूर येथे शेतकरी मेळाव्याला खासदार श्री प्रफुल पटेल यांनी संबोधित करतांना केले. यावेळी कारखान्याला ऊस पुरवठा व वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांचा खा.श्री प्रफुल पटेल यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

खा. श्री प्रफुल पटेल पुढे म्हणाले कि, वैनगंगा व चुलबंद नदीच्या खोऱ्यात असलेल्या या परिसरात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक असून लाखांदूर, साकोली, लाखनी, अर्जुनी मोरगाव, पवनी व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वरदान ठरेल यादृष्टीने याकरिता शेतकऱ्यांच्या हितासाठी व युवकांच्या रोजगारासाठी साखर कारखाना सुरु करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी दुप्पट वाढ करून कारखान्याची गाळप क्षमता १ लाख २१ हजार मेट्रिक टन करण्यात आली आहे. यामुळे हजारो शेतकरी व शेतमजुरांना काम मिळणार आहे. यावर्षी उसाला वाढीव भाव देण्याचे तसेच ऊस तोड कामगारांना सुद्धा कटाई चे दर वाढविण्याचे निश्चित केले असून ते मिळणारच यात शंका नाही.


क्षेत्रातील शेतीला सिंचन करण्याचे स्वप्नं पूर्ण करण्याच्या उद्देशाने गोसे/खुर्द, इटियाडोह, चुलबंध सारख्या प्रकल्पामुळे सिंचन होत आहे धापेवाडा टप्पा २ चे पाणी खळबंदा, चोरखमारा व अन्य जलाशयात सोडणार आहोत तसेच भविष्यात धापेवाडा टप्पा ३ मध्ये लाखनी व साकोली पर्यंत पाणी आणून शिवणी, नवेगावबांध व इतर लहान मोठ्या जलाशयात सोडण्याचे माझे प्रयत्न चालू आहेत.

महायुती सरकारच्या माध्यमातून मागील वर्षी २० हजार हेक्टरी धानाला बोनस देण्याचे काम केले. यावर्षी सुद्धा हेक्टरी २५ रुपये बोनस मिळवून देणार आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज, किसान सन्मान योजना, लाडली बहीण योजनेचे पैसे खात्यात येणे सुरु आहे. युवा कार्य प्रशिक्षण च्या माध्यमातून युवकांना रोजगार देण्याचे काम सरकार करीत आहे. या योजना अविरत चालू ठेवण्यासाठी आपण सर्वांनी विचार करावा असे प्रतिपादन खासदार श्री प्रफुल पटेल यांनी केले.

शेतकरी मेळाव्याला खा.श्री प्रफुल पटेलजी यांच्या सोबत सर्वश्री राजेन्द्र जैन, मनोहर चन्द्रिकापुरे, सुनील फुंडे, धनंजय दलाल, संजय गुजर, अविनाश ब्राम्हणकर, यशवंत सोनकुसरे, सत्यजीत गुजर, विनायक बुरडे, बालू चुन्ने, यशवंत गणवीर, बाळकृष्ण मेंडलकर, धनु व्यास, संजना वरखडे, निमाबाई ठाकरे, देवीदास राउत, विनायक बुरडे, नंदू समरीत, सरिता मदनकर, उमराव आठोले, कल्पना जाधव, ज्ञानेश साखरे, अंगराज समरीत, जया भुरे, भूमालाताई कुंभरे, राकेश राऊत, सुरेश बघेल, नागेश वाघाये, अर्चना ढेंगे, सतीश समरीत, व्यंकट मेश्राम, शंकर खराबे, विलास शेंडे, वैशाली हटवार, गिता लंजे, संजय नाहाले, राकेश मुंदलकर, रजनीकांत खंडारे, वैभव खोब्रागडे, चौधरीजी सहित मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Related posts