गोंदिया: आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता बैठक तेजस्विनी लॉनं, सडक/अर्जुनी येथे खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. मागील काही दिवसापासून गोंदिया जिल्ह्यात सतत अतिवृष्टी होत असल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई करण्यासंबंधीचे प्रशासनाला निर्देश दिले असून कोणताही नुकसान ग्रस्त सर्वेक्षणातून नोंदणीवाचून वंचित राहू नये याबाबत सूचना दिल्या आहेत असे कार्यकर्ता मेळाव्याला संबोधतांना खासदार प्रफुल पटेल बोलत होते.
पुढे श्री प्रफुल पटेल म्हणाले की, महायुतीची सरकार हि शेतकरी, शेतमजूर, महिला, युवकांचे कल्याण करणारी असून अनेक हितकारी योजना अंमलात आणल्या आहेत. केंद्र सरकारच्या धर्तीवर व राज्य सरकार शेतकऱ्यांना सन्मान निधी देत आहे. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी महायुती सरकार व्दारा मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेतून महिन्याला १५०० रुपये जुलै महिन्यापासून मिळणार आहेत. युवा प्रशिक्षण च्या माध्यमातून युवकांना रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे. आमची महायुतीची सरकार जनकल्याणासाठी असून राज्यातील सर्व घटकांना चालना मिळेल अश्या योजनांची सरकार अंमलबजावणी करीत आहे. राज्यातील जनतेचा विकास हा ध्येय समोर ठेवून राज्याच्या प्रगती व उन्नती करीता कटिबद्ध सरकार काम करीत आहे. असे प्रतिपादन श्री प्रफुल पटेल यांनी केले.
याप्रसंगी श्री प्रफुल पटेल यांच्या सोबत माजी आमदार श्री राजेंद्र जैन, आमदार श्री मनोहर चंद्रिकापुरे, सुनील फुंडे, प्रेमकुमार रहांगडाले, अविनाश ब्राह्मणकर, यशवंत गणवीर, अविनाश काशिवार, रजनी गिऱ्हेपुंजे, शिवाजी गहाणे, वंदना डोंगरवार, दीक्षा भगत, शाहिस्ता शेख, शशिकला टेम्भूर्णे, कामिनी कोवे, आंनद अग्रवाल, देवचंद तरोणे, रमेश चुर्हे, प्रभुदयाल लोहिया, बाबुराव कोरे, रूपविलास कुरसिंगे, दाणेश साखरे, तेजराम मडावी, गजानन परशुरामकर, राहुल यावलकर, मंजूताई चंद्रिकापुरे, डॉ सुगत चंद्रिकापुरे, विशाल शेंडे, भृंगराज परशुरामकर यांच्या सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.