NCP च्या माँगण्या: 24 तास पाणी पुरवठा करण्याची घोषणा हवेतच, पाणी पुरवठा योजनेचे काम गुणवत्तापूर्ण करा

454 Views

 

जुलै 18/प्रतिनिधि

गोंदिया: शहरातील पाणी पुरवठा व पाणी वापराचे मीटर ची गुणवत्ता सुधारावी यासह अन्य मागण्यांना धरून खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या निर्देशानुसार व माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिष्टमंडळाच्या वतीने महाराष्ट्र जिवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता श्री गणवीर यांना निवेदन देण्यात आले.

मागील अनेक वर्षापासून गोंदिया शहर वासियांना २४ तास पाणी पुरवठा करण्याची घोषणा हवेतच असून शहर वासियांना दिवसाला अर्धा तासापेक्षा अधिक वेळ पाणी मिळत नाही त्यामुळे नगरवासी त्रस्त आहेत. शहर वासियांना पुरेशा पाणी पुरवठा व्हावा याकरिता नगरोत्थान महाभियान अंतर्गत नुकताच गोंदिया शहर वासियांना पाणी पुरवठा करण्यासाठी अंदाजे किंमत २.३७ कोटी रुपयाचा पाणी पुरवठा प्रकल्प मंजूर करण्यात आला. सदर प्रकल्पाचे कार्यान्वयन गोंदिया नगर परिषदेमार्फत होणार आहे. हे काम नगरपरिषदेने त्वरित चालू करावे. तसेच पाणी पुरवठा प्रकल्पाचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने करण्यात आली.

तसेच शहर वासियांना पाणी पुरवठा होण्याच्या दृष्टीने नळ कनेक्शन देण्यात आले असून त्यावर महाराष्ट्र जिवन प्राधिकरण व्दारा पाण्याचे मीटर लावण्यात आले आहेत. पाण्याचे मीटर गुणवत्ता पूर्ण नसल्याने लवकर खराब होत आहेत तसेच नविन मीटर लावण्यात येत नाही. यामुळे पाणी वापराचा बिल अवाढव्य येत असून ग्राहकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो. अश्या ग्राहकांकडून पाणी वापराची सरासरी राशी (बिल) न घेता न्युनतम राशी घेण्यात यावी.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मागील अनेक दिवसापासून गोंदिया शहर वासियांना २४ तास पाणी पुरवठा व्हावा अशी मागणी करीत असून याकडे दुर्लक्ष करण्यात आले. येणाऱ्या काही दिवसात शहर वासियांना 24 तास पाणी पुरवठा करणे व पाणी मीटरचे बिल कमी न झाल्यास या मागण्यांना धरून पार्टी आंदोलन करेल असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने M.J.P. कार्यकारी अभियंता श्री गणवीर यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन देतांना शहर अध्यक्ष नानू मुदलियार, विनायक शर्मा, नागो बन्सोड, अनुज जायस्वाल, हर्षवर्धन मेश्राम, प्रमोद कोसरकर, प्रशांत सोनपुरे, योगेश जोशी, रौनक ठाकूर, कपिल बावनथडे, मंगेश रंगारी, कुणाल बावनथडे, शरभ मिश्रा सहित अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts