गोरेगाव। तालुक्यातील मोहाडी ग्रांम पंचायत येथे मागील एक वर्षापासून गावातील विविध विकासकामे जोमात सुरू आहेत व गांवातील नागरिकांना सुध्दा गावात रोजगार उपलब्ध करून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मामा तलावाच्या खोलीकरणाचे कामे सुरू करून मजुरांचे स्थलांतर थांबविण्यात ग्रांम पंचायत ला यश आले।
त्यातच आज दिनांक ९ फेब्रुवारी ला अठरा लक्ष रूपये चे विविध विकासकामांचे भूमिपूजन मुंडीपार जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य डॉ लक्ष्मनजी भगत यांच्या हस्ते करण्यात आले।
यात जीवनलाल कटरे यांच्या घरापासून ते विठ्ठल हरिणखेडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम ७ लक्ष रूपये, अंगणवाडी क्रमांक १ येथे पेव्हिंग ब्लॉग बसविणे ३ लक्ष रूपये, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा येथे शौचालय बांधकाम दुरुस्ती व रंगरंगोटी करणे ५ लक्ष रूपये व श्रीराम मंदिर देवस्थान परिसर येथे पेव्हिंग ब्लॉग बसविणे ३ लक्ष रूपये अशा अठरा लक्ष रूपये चे विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले।।
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे, प्रमुख अतिथी ग्रांम पंचायत उपसरपंच मोहनलाल पटले, सामाजिक कार्यकर्ता कमलेश पटेल, सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे जे पटले, सेवानिवृत्त, शिक्षक वाय एफ पटले, सेवानिवृत्त केंद्र प्रमुख एन के बिसेन,आर एफ पारधी सर,माजी सरपंच रजनीताई धपाडे, माजी सैनिक कुवरलाल चौधरी, ग्रांम पंचायत सदस्य पुस्तकला पटले, पुजाताई डोहाळे, रोजगार सेवक चेतेश्वरी पटले, हिरामण पटले, नारायण बघेले, शिवराम मोहनकार, तेजलाल कावडे, लक्षीराम भोयर, पालिकराम पटले, विक्की धपाडे, सेवकराम राणे,भुराजी भोयर, चुळामन पटले,टेलिरामजी पटले, सहायक शिक्षक टि पी डावखरे सर, भाऊलाल तुरकर, टोलीराम भोयर,भुवन राऊत, बंन्टी चौव्हाण बलिराम वाळवे, धिरजकुमार राहांगडाले श्रीद्वार पटले आदी उपस्थित होते।
यावेळी कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मोहाडी ग्रांम पंचायत चे ग्रांम सेवक पी बी टेंभरे यांनी केले यावेळी गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते।