सेवानिवृत्त गुरुजनांचा होणार भव्य सत्कार, रामकृष्ण विद्यालय 1995 वर्ग 10 वी बॅचकडून 27 ऑगस्टला आयोजन..

174 Views

 

कार्यक्रमात 28 वर्षांनंतर एकत्र येणार माजी विद्यार्थी व शिक्षक…

गोंदिया प्रतिनिधी
गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी येथील रामकृष्ण विद्यालयात वर्ग 10 वी मध्ये 1995 च्या दरम्यान शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनकडून दि. 27 ऑगस्ट रविवार रोजी कुऱ्हाडी येथील रामकृष्ण विद्यालयात गुरुजनांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी गुरुजनांचा भव्य सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती माझी विद्यार्थ्यानी दिली आहे.

कुऱ्हाडी येथिल रामकृष्ण विद्यालय येथे 1995 दरम्यान वर्ग 10 वी मध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रांत आपापली जबाबदारी पार पाडत आहेत. या बॅचच्या माझी विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा सत्कार व विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले आहे. दि. 27 रोजी कुऱ्हाडी येथे हा कार्यक्रम मोठया थाटात साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान 1995 मध्ये वर्ग दहावी मध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी व त्यांना शिकवणारे शिक्षक, कर्मचारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने तब्बल 27 वर्षानंतर एक दुसऱ्यांना भेटणार आहेत. निमंत्रित शिक्षक व कर्मचाऱ्यांना मोमेंट देऊन सत्कार करण्यात येणार आहे.त्यानुसार सर्व शिक्षकांसी संपर्क साधण्यात आलाआहे. या कार्यक्रमामध्ये सर्व माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माहेश्वरी जोशी, प्रेरणा सोनवणे, रशीला येरणे ,नीतू भेलावे, कीर्ती उकरे, सत्यभामा पटले, गीता डीब्बे, आनंद पटले शैलेश नंदेश्वर, भरत घासले , अमीर सय्यद,दुर्गाप्रसाद चौधरी, ओमप्रकाश डीब्बे, ईश्वर उखरे, पंकज वरखडे,पुरुषोत्तम अंबुले, लिकेश राहंडाले ,रंजीत शहारे भालचंद बघेले, वामन पटले, चौकलाल वाळवे, रणजीत शहारे ,रामू पारधी, शंकर पारधी ,प्रमोद रहांगडाले जितेंद्र राहंडाले, धनेंद्र तुरकर थवेंद्र दिहारी,योगराज कावडे मिलिंद कटरे व सर्व माझी विद्यार्थ्यानी केले आहे

Related posts