स/अर्जुनी तालुका सरपंच संघटनेची कार्यकारणी गठीत, सौंदड सरपंच हर्ष मोदी अध्यक्षपदी विराजमान..

345 Views

 

प्रतिनिधी।

सडक अर्जुनी। तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत यांना एकत्रित करून संघटन निर्माण करण्याचे कार्य मागील अनेक वर्षापासून सरपंचांच्या माध्यमातून सुरू आहे. सडक अर्जुनी तालुका सरपंच संघटना अनेक वर्षापासून नवनियुक्त सरपंचांचे विविध समस्या आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून लोकाभिमुख कार्य करत असते. यावर्षी सुद्धा संघटनेच्या कार्यकारिणीची उपसभापती शालिंदर कापगते यांच्या अध्यक्षतखाली निवडणूक घेऊन गठन करण्यात आले.

८ ऑगस्ट रोजी निवडणुकीच्या माध्यमातून अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली असून इतर कार्यकारणी बिनविरोध निवडण्यात आली. तालुक्यातील एकूण 63 ग्रामपंचायतींपैकी 53 ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवून अध्यक्षपदासाठी मतदान केले.

अध्यक्षपदासाठी एकूण तीन उमेदवार रिंगणात होते. ज्यात माधवराव तरोणे, हर्ष मोदी आणि लता गहाणे यांनी अनुक्रमे १९, ३० आणि २ मते मिळवली, तर २ मते अवैद्य ठरले.

सर्वाधिक 30 मते घेऊन हर्ष विनोदकुमार मोदी अध्यक्ष पदावर विराजमान झाले असून इतर सर्व कार्यकारणी बिनविरोध निवड करण्यात आली.

यामध्ये महिला प्रमुख शर्मिला चिमणकर, तालुका उपाध्यक्ष प्रशांत बारसनवार, सचिव विलास वट्टी, सहसचिव प्रतिभा भेंडारकर, कोषाध्यक्ष गुलाब तोंडफोडे, तर सदस्य म्हणून कुंदा कशिवार, योगेश्वरी चौधरी, नितेश गुरणुले, किरण हटवार यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी मंचावर निवडणूक पूर्ण करण्यासाठी सभापती संगीता खोब्रागडे आणि उपसभापती शालींदर कापगते उपस्थित होते. सर्व नवोदित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत निवडणूक संपन्न करण्यात आले.

Related posts