गोंदिया: ट्रेन वरुन पडलेल्या त्या 16 वर्षीय तरुणीचे अखेर निधन…

1,472 Views

 

प्रतिनिधि। 8 आगस्ट

गोंदिया:- 31 जुलै रोजी दरेकसा रेल्वे स्थानकाजवळ ट्रेन वरुन पडून घडलेल्या घटनेत जखमी झालेल्या 16 वर्षीय तरुणी कु. ईशा सुनील धकाते हिचे काल 07 ऑगस्ट ला नागपुर येथील एम्स मध्ये निधन झाले. मृतक तरुणी 11 व्या वर्गात शिकत असलेली विद्यार्थिनी होती. प्राप्त माहितीनुसार कु.ईशा ही आपल्या मैत्रिणी सोबत गोंदिया वरुन मुंबई हावडा एक्सप्रेस ने डोंगरगढ़ ला जात होत्या, दरम्यान दरेकसा रेल्वे स्थानकाजवळ सदर घटना घडली. जखमी अवस्थेत तिला प्राथमिक उपचारार्थ सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. नंतर गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालय हलविण्यात आले. डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने स्थानिक खाजगी इस्पितळात शस्त्रक्रिया करण्यात आली. स्थितीत सुधारणा होत नसल्याने नागपुर येथील एम्स इस्पितळात हलविण्यात आले. एम्स येथे मृत्यूशी झुंज देतानाही काल पहाटे 4 च्या सुमारास तरुणीने अंतिम श्वास घेतला. तिच्या गेल्याने संपूर्ण परिवार शोकमग्न झाला. आज 8 ऑगस्टला सकाळी 11 वाजता पार्वती घाट मोक्ष धाम येथे अंतिम संस्कार करण्यात आला.

Related posts