तिरोड़ा: चालत्या इंडिका कारला आग, दोन इसम सुदैवाने बचावले

551 Views

 

प्रतिनिधि।
तिरोडा (दि.२३)- काल दिनांक २२ च्या रात्री साडेनऊ वाजता दरम्यान तिरोडा- तुमसर रोडवरील बिरसी नाल्याजवळ चालत्या इंडिका कारने पेट घेतला. सुदैवाने मागून येणाऱ्या बाईक चालकाच्या सतर्कतेने कार मधील प्रवासी बचावले.


काचेवाणी येथील संतोष पारधी हे महेंद्र रहांगडाले यांच्यासह वडेगाव वरून रात्री साडेनऊ दरम्यान गावाकडे परत येत असताना बिरसी नाल्याजवळ त्यांच्या इंडिका कार क्रमांक MH12 FF0806 ने खालून पेट घेतला. मागून येणाऱ्या बाईक स्वाराच्या लक्षात येताच त्याने समोर येऊन त्यांना सतर्क केले. दोघेही त्वरित खाली उतरल्या मुळे सुदैवाने दोघांचेही प्राण वाचले.

कार पूर्ण जळून राख झाली. थोड्या वेळात नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने कार विझवली. पोलीस दल देखील घटनास्थळी पोहोचले होते. अज्ञात बाईकस्वाराच्या समय सूचकतेने दोघांचेही प्राण वाचले व मोठा अनर्थ टळला. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related posts