जागतिक आदिवासी दिन उत्सवच्या पूर्वतयारी करिता नेशनल आदिवासी पीपल फेडरेशन गोंदियाची सभा संपन्न…. करण टेकाम

245 Views

 

गोंदिया : नेशनल आदिवासी पीपल फेडरेशन गोंदियाच्या वतीने शिक्षक सहकारी पत संस्था गोंदिया येथे 9 ऑगस्ट 2023 जागतीक आदिवासी दिवस जिल्हा स्तरावर आयोजन करण्याकरीता सभा घेण्यात आली.

सभेत जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्याकरिता विविध विषयवार चर्चा व जिल्हा स्तरावर 4 ते 5 हजार आदिवासी लोक एकत्रीत करून गोंदिया येथे विविध आदिवासी सांस्कृति, परंपरा, लोकनुर्त्य, वाद्य, संगीत, रैला, प्रभोधन ई . स्वरुपात जागतिक आदिवासी दिवस गोंदिया येते साजरा करण्यात येनार आहे.

एच सी भोयर यांच्या अध्यक्षतेत प्रमुख मार्गदर्शक नेशनल आदिवासी पीपल फेडरेशन केंद्रीय सचिव दुर्गाप्रसाद कोकुडे, पीपल फेडरेशन जिल्हा अध्यक्ष करण टेकाम, सचिव नीलकंठ चिचाम, महिला उपाध्यक्ष संगीता पुसाम, चत्रुघन मरकोल्हे , प्रमिला सिंद्रामे, भोजराज मसराम, एड विवेक धुर्वे, जगदीश मडावी ,धनलाल उईके, ममता नागभीरे, वंदना टेकाम, लक्ष्मण कुंभरे, रोहित कोरोटे, रंजना उईके, दिलेश्वरी मर्सकोल्हे, सुरेश बोरकर, जगन्नाथ घासले, व्यंकट चनाप, विष्णु मसराम, प्रशांत सिडाम , राकेश प्रधान, राजकुमार वरकड़े, रामेश्वर नागभीरे, सभेत जिल्हातील विविध आदिवासी कर्मचारी , पीपल फेडरेशन, महीला फेडरेशन, आदिवासी विद्यार्थी संघ, जंगल सोसायटी, बिरसा ब्रिगेड, बिरसा फाइटर, रानी दुर्गावती महीला संघटन,कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्तित होते .

Related posts