अ/ मोरगाव विस क्षेत्राचा ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ता मेळावा संपन्न, ‘जेष्ठ‘ म्हणजे ‘अनुभव‘ : माजी मंत्री बडोले

365 Views

 

प्रतिनिधी / अर्जुनी मोरगाव : ज्येष्ठांनी आपली काळजी घेतली आता आपण ज्येष्ठांची काळजी घ्यावी तसेच समाजात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांशी संपर्क ठेवून त्यांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले पाहिजे सोबतच ज्येष्ठांच्या आरोग्यासंबंधी तसेच ज्येष्ठांची सरकारी कार्यालयांतील कामे करून घेण्यासाठी मदत केली करा व वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, सणांच्या दिवशी विशेष शुभेच्छा संदेश ज्येष्ठांपर्यंत पोचवा. केंद्र सरकार ने तीर्थयात्रा सोपी केली असून आधी लागणारा वेळ आणि आता लागणारा वेळ यात फार तफावत आहे. केदारनाथ यात्रा असेल किंवा बाबासाहेबांचे पंचतीर्थ ज्येष्ठांना त्यांचे दर्शन घडवून पुण्य कमविण्याची संधी गमावू नका असे प्रतिपादन माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ता मेळाव्यात केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी समर्पित 9 वर्ष पूर्ण केल्याबद्दल संपूर्ण देशभरात “मोदी@9” हे अभियान राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून अर्जुनी-मोर विधानसभा मतदार संघातील नवेगाव बांध ता.अर्जुनी-मोर येथे माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत “भाजपा जेष्ठ कार्यकर्ता सम्मेलन” संपन्न झाले. दरम्यान मोठ्या संख्येने जेष्ठ भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

‘जेष्ठ‘ म्हणजे ‘अनुभव‘ : माजी मंत्री राजकुमार बडोले
माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आपल्या मनोगतातुन मोदींजींच्या ९ वर्षाच्या कार्यकाळात झालेले अभूतपूर्व निर्णय व विकास कामे यांची सविस्तर माहिती दिली तसेच भारतीय जनता पक्षाच्या पायाभरणीत अनेक जेष्ठ नेते, कार्यकर्ते यांचे योगदान हे खूप मोठे आहे.

पक्षाचा जो वटवृक्ष आज झाला आहे त्याची आधार देणारी मुळे खऱ्या अर्थाने ही जेष्ठ मंडळी आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात जेष्ठांच्या आशीर्वाद व मार्गदर्शनाची गरज आम्हा पदाधिकारी व पक्षाला कायम राहील अश्या भावना माजी मंत्री बडोले यांनी व्यक्त केली.

यावेळी जिल्हा महामंत्री तथा गटनेते लायकराम भेंडारकर, तालुकाध्यक्ष विजय कापगते, प्रकाश गहाणे, जेष्ठ नेते नामदेवराव कापगते, शिवनारायण पालीवाल, लुणकर चितलांगे, केवळराम कापगते, विजयाताई कापगते, डॉ.गजानन डोंगरवार, डॉ.नाकाडे, डॉ.गाडेकर साहेब, परिमलजी वैद्य, अण्णा डोंगरवार, टिकाराम नाकाडे, खुशाल काशिवर, प्रल्हाद कोरे, गिरधारी हत्तीमारे, हेमराज लोगडे, विजय अरोरा, शिवराम लोधी, डॉ.नाजूक कुंभरे, लैलेश्वर शिवणकर, होमराज पुस्तोडे, कविताताई रंगारी, निशाताई तोडासे, प्रतिभाताई भेंडारकर, संजय खरवडे, पराग कापगते, जयंत लांजेवार, नमुदेव नागपुरे, अरविंद नागपुरे, दलित भोयर आदी मान्यवरांसह जेष्ठ कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts