गोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक संपन्न
गोरेगाँव। आज (15जून) रोजी गोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक गोरेगाव स्थित जगत महाविद्यालय येथे माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. खासदार श्री प्रफुल पटेल यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदी निवड झाल्याबाबद्दल सत्कार, नव्याने बूथ कमेटी तयार करणे व अन्य महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.
निवडणुका असोत किंवा नसोत पक्षाची संघटन बांधणी हि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कार्याची व शेतकरी, कष्टकरी जनतेच्या हिताकरिता केलेल्या कार्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाने तळागाळातील घटकापर्यंत पोहचून पक्ष बांधणी करावी प्रत्येक बूथ वर युवक, महिला व जेष्ठ नागरिक यांचा समावेश करावा अश्या सूचना माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी केल्यात.
यश प्राप्त करायचे असेल तर योग्य नियोजन करूनच ते साध्य करता येते आणि नियोजन करण्यासाठी बूथ कमिटीची नितांत गरज आहे आणि ती प्रत्येक गावातील बूथ तयार करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घ्यावी असे जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर यांनी प्रतिपादन केले.
यावेळी गोरेगाव तालुका अंतर्गत बूथ प्रमुख जिल्हा परिषद क्षेत्र निहाय्य, घोटी जि.प.सोमेश्वर रहांगडाले, मुंडीपार जि.प.सुरेंद्र रहांगडाले, निंबा जि.प.बाबा बहेकार व गिरिधारी कटरे, सोनी जि.प.रामू हरिणखेडे व बबलू वंजारी, शहरवानी जि.प.श्रीप्रकाश रहांगडाले, कुऱ्हाडी जि.प.भोजराज चव्हाण व खुशाल वैद्य, गोरेगाव शहर बूथ प्रमुख कृष्णकुमार बिसेन व डॉ रुस्तम येडे यांची नियुक्ती करण्यात आली.
सर्वश्री राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी, राजलक्ष्मी तुरकर, रविकांत बोपचे, केतन तुरकर, विशाल शेंडे, केवल बघेले, सोमेश रहांगडाले, महेंद्र बघेले, रामू हरिणखेडे, कृष्णकुमार बिसेन, श्रीप्रकाश रहांगडाले, डॉ रुस्तम येडे, बाबा बहेकार, कल्पना बहेकार, अनिता तुरकर, ललिता पुंडे, श्रद्धा रहांगडाले, डिलेश्वरी तिरेले, सुरेंद्र रहांगडाले, प्रतीक पारधी, कमलेश बारेवार, घनेश्वर तिरेले, प्रमोद जैन, रुपचंद कटरे, सुनील कापसे, ञानेश्वर सहारे, रामेश्वर पटले, सतनाम राऊत, जीवन बावणे, ताणू हरिणखेडे, दिनेश परतेती, पंढरीनाथ मेश्राम, चुन्नीलाल राऊत, उमेश बिसेन, एम जी बोरकर, इंद्रराज डोंगरे, पप्पूभाऊ डोंगरे, महेश कटरे, अनुप बोरकर, रमेश ढोमणे, संजय डोमळे, सुनेंद्र गौंधर्य, रवींद्र चौधरी, विजय कुर्वे, पुरुषोत्तम चौधरी, सदाराम राणे, विजय पारधी सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.