मोहाडी येथे रोहयो अंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन, सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांच्या पुढाकाराने विविध विकासकामांना सुरूवात 

405 Views

गोरेगाव ,(२७ मे). तालुक्यातील ग्रांम पंचायत मोहाडी येथे आज महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मामा तलाव चे खोलीकरण करणे चाळीस लक्ष रूपये व नॉडेप कॉपोस्ट अंतर्गत गांवातील प्रत्येक घरी कचराकुंडी बांधकाम अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य डॉ लक्ष्मनजी भगत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे, उपसरपंच मोहनलाल पटले, ग्रांम पंचायत सदस्य भिवराज शेंडे, योगराज भोयर, खेमराज वाकले, तंन्टामुक्ती गांव समिती चे अध्यक्ष लिखीराम बघेले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे जे पटले, ग्रांम पंचायत सदस्य प्रभा पंधरे, चंन्द्रकांता पटले, पुस्तकला पटले, नेहाताई उके, सामाजिक कार्यकर्ता प्रमानंद तिरेले,छगनलाल पटले, कमलेश पारधी तेजलाल कावडे, शिवराम मोहनकार,आर एफ पारधी सर,,चुळामन पटले, रोजगार सेवक चेतेश्वरी पटले, संघनक परिचालक भुवन राऊत,टोलीराम भोयर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य डॉ लक्ष्मनजी भगत यांनी सांगितले की गावात येणाऱ्या समस्या चा अभ्यास करून सार्वजनिक विकासाबरोबर शासनाच्या विविध योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहचविण्याचे काम करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी कार्यक्रमाचे संचालन व आभार ग्रांम पंचायत चे ग्रामसेवक पी बी टेंभरे यांनी केले.

Related posts