दिव्यांगांच्या आयुष्यात आनंद आणण्याचे काम सरकारचे : पालकमंत्री मुनगंटीवार

401 Views

 

खा. सुनील मेंढेंच्या प्रयत्नातून दिव्यांगांना मोफत साहित्याचे वाटप

गोंदिया: दिव्यांगांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. दिव्यांग ही सामान्यांप्रमाणे जगू शकतील यासाठी सरकारचे प्रयत्न अविरत सुरू आहेत, असे मत राज्याचे वनमंत्री आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.


खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकारातून भंडारा गोंदिया जिल्ह्यात दिव्यांग बांधवांना साहित्य देऊन त्यांचे जीवन सुकर करता यावे या हेतूने दोन महिन्यांपूर्वी मूल्यांकन शिबीर झाली होती. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालय आणि ए डी आय पी विभागाच्या वतीने झालेल्या शिबिरात पात्र ठरलेल्या दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप करण्याच्या दृष्टीने वाटप शिबिराचे आयोजन आज गोंदिया येथील पवार बोर्डिंग येथे करण्यात आले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी उपस्थित दिव्यांग बांधवांनी त्यांच्या नातेवाईकांना संबोधित करताना सुधीर मुनगंटीवार यांनी मिळणाऱ्या साहित्याच्या माध्यमातून सुकर आणि सहज जीवन जगता यावे यासाठी शुभेच्छा दिल्या. केंद्र आणि राज्य सरकार दिव्यांगांच्या कल्याणाच्या दृष्टीने अनेक उपक्रम हाती घेत आहे. दिव्यांगांच्या आनंदी जीवनाची जबाबदारी सरकारची आहे. म्हणूनच आता दिव्यांगांना एका विशिष्ट अपंगत्वाच्या टक्केवारीनंतर 1500 रुपये दरमहा अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.


यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना खासदार सुनील मेंढे यांनी केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. केंद्र सरकार व्यापक स्तरावर विकास करीत आहे. ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत विकासाच्या विविध कल्पना राबविताना ग्रामीण लोकांचे कल्याण हा ध्यास कायम आहे. गोरगरीब जनता सक्षम व्हावी म्हणून तिला आधार देण्याच्या दृष्टीने साहित्य वाटपाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम केंद्र शासनाने हाती घेतला असल्याचे सांगितले. ज्या ज्या लोकांची नोंदणी झाली अशा प्रत्येकाला हे साहित्य मिळेल. शिबिरात ज्यांना साहित्य मिळाले नाही त्यांचे साहित्य त्यांना मिळेपर्यंत मी पाठपुरावा करीन असा विश्वास यावेळी खासदार सुनील मेंढे यांनी दिला.

Related posts