गोंदिया: निवासी शाळा मूर्री येथील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकले…

1,064 Views

गोंदिया।(4मे). महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे संपूर्ण राज्यात दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी इयत्ता 5 वी व 8 वी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गोंदिया जिल्ह्यातील अनु.जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपुरा मूर्री या शाळेतील एकूण 21 विद्यार्थी इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेले होते. त्यापैकी एकूण 8 विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी पात्र ठरलेले आहेत.

पात्र विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत ; 1) सोहन दिलीपकुमार पटले 69.33 % 2) सावन बळीराम जाधव 69.33 % 3) अनामिक रमेश दुर्योधन 68.66 % 4) योगेश ज्ञानेश्वर डोंगरे 60.00% 5) वेदांत जगदीश शहारे 56.00 % 6) तुषार कृष्णकुमार बागडे 56.00 % 7) अमोल दिलीप शहारे 52.00 % 8) विश्वजित मुकेश गजभिये 49.33 % इत्यादी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्ती साठी पात्र ठरलेले आहेत.

याप्रसंगी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र व उत्तीर्ण झालेल्या आमच्या अनु.जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, नंगपुरा मूर्री येथील विद्यार्थ्यांच्या देदीप्यमान यशाबद्दल विनोद मोहतुरे सर, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण गोंदिया व शाळेचे मुख्याध्यापक आर. पी. इठुले सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून गोडकौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार्‍या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.

दरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय सर्व शिक्षकांना दिले आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल पालकांनी समाधान व्यक्त करून मुख्याध्यापक आणि सर्व मार्गदर्शन करणार्‍या शिक्षकांचे आभार मानले.

Related posts