धक्कादायक घटना महिला पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू; आंधळगाव पोलीस स्टेशन येथील घटना

163 Views

 

तुमसर प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने

आंधळगाव(जि. भंडारा): भंडारा जिल्हा पोलीस दलामध्ये २००८ पासून कार्यरत असलेल्या ३८ वर्षीय महिला पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. प्रज्ञा मोहनलाल चव्हाण (रा. आंधळगाव) असे मृत पावलेल्या पोलीस महिला कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
चव्हाण यांना काल ३० एप्रिलला रात्री १०:३० वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन आंधळगाव येथे ड्युटीवर कार्यरत असताना हृदयविकाराचा धक्का आला होता. त्यांना उपचारार्थ भंडारा येथे हलवीत असताना मृत्यू झाला. ३० एप्रिलला आंधळगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी पोलीस स्टेशनमध्ये एक छोटेखानी पार्टीचे आयोजन केले होते. रात्री साडेदहाला जेवण करत असताना तिला हृदयविकाराच्या झटका आला.
उपस्थित पोलीस कर्मचारी व ठाणेदार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र आंधळगाव येथे तिला ताबडतोब प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले. मात्र पुढील उपचारासाठी तिला भंडाऱ्याला नेत असतानाच वाटेतच तिच्यावर काळाने झडप घेतली. प्रज्ञा चव्हाण ह्या आंधळगाव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होत्या. त्यांची सासुरवाडी आंधळगाव येथीलच आहे तर माहेर भंडारा जवळील खोकरला येथील असल्याचे समजले.
त्या गेल्या पंधरा वर्षापासून भंडारा पोलीस दलात कार्यरत होत्या. त्यांच्या मागे एक मुलगा, पती असा परिवार आहे. आज आंधळगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले करण्यात आले. याप्रसंगी पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर, पोलीस निरीक्षक तथा आंधळगाव पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस कर्मचारी गावकरी उपस्थित होते..

Related posts