देवरी: पक्ष मजबूत करण्यासाठी पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे- माजी आमदार राजेन्द्र जैन….अनेकांनी केले राष्ट्रवादीत प्रवेश

246 Views

प्रतिनिधि।

देवरी।आज देवरी येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुक्याच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातील पक्ष संघटन मजबूत करने, प्रत्येक गावात बूथ कमेटी स्थापन करण्या सोबतच शासनाच्या जनहितोपयोगी योजना सामान्य लोकांना समजावून देणे व येणा-या जिल्हा परिषद व पंचायत समिति निवडणुकीच्या तयारी संदर्भात आयोजित बैठकीत निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश माजी आमदार श्री राजेन्द्र जैन यांनी दिले।

या बैठकीत तालुक्यातील अनेक कार्यकर्तानी खासदार श्री प्रफुल पटेल यांचा नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीमधे प्रवेश केला। यात चिचगड जिल्हापरिषद मधील सिमरण जांगडे, माधुरी यादवजी शहारे, अनीक्षा पठाण, निर्मला मेळे, देवकाबाई पिहदे, गौतम वैद्य तसेच देवरी शहर येथे कोमल मुकेश खरोले, प्रियंका सलामे, प्रतिभा पी देशपांडे, सुबोध पी देशपांडे यांनी प्रवेश केला.

आयोजित बैठकीत सर्वश्री नरेश माहेश्वरी माजी सभापती म्हाडा, रमेश ताराम सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती देवरी, गोपाल तिवारी जिल्हा उपाध्यक्ष , इंदलजी अरकरा माजी उपसभापती पंचायत समिती देवरी, सि. के. बिसेन तालुकाध्यक्ष राकाँपा देवरी, पारबताबाई चांदेवार महिला तालुकाध्यक्ष राकाँपा देवरी, भैयालाल चांदेवार संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती देवरी, भाष्कर धर्मशहारे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती देवरी, हरीभाऊ राऊत संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती देवरी , अमरदास सोनबोईर , योगेश देशमुख, बबलु भाटीया, मनिष मोटघरे , नेमीचंद आंबिलकर नगरसेवक ,सुमन बिसेन माजी नगराध्यक्षा न.पं.देवरी, मुकेश खरोले शहराध्यक्ष, अर्चनाताई ताराम माजी सदस्य पंचायत समिती देवरी, दिलीप दुरुगकर, मनोहर राऊत, सुजितजी अग्रवाल, तेजराम मडावी, रवी बडवाईक व मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते।

Related posts