सरपंच यांनी दिला ज्येष्ठ नागरिकांना मान, पिंडकेपार ग्रामपंचायत येथे ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते ध्वजारोहण

762 Views

 

गोरेगाव। 1 मे महाराष्ट्र दिवस संपूर्ण महाराष्ट्र राज्यात साजरा केला जात आहे अशा वेळी महाराष्ट्रदिनी पिंडकेपार ग्रामपंचायतच्या सरपंचानी घेतलेल्या क्रांतिकारक निर्णयाने संपूर्ण गावाला सुखद धक्का दिलाय.

गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पिंडकेपार गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयात मुख्य ध्वजारोहण करण्याचा निर्णय सरपंच योगिता शहारे यांनी घेतला. 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून गावातील ज्येष्ठ नागरिक श्री माननीय हगरूजी बिसेन यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला . ध्वजारोहण होताच उपस्थितांनी आनंद साजरा केला.

गोरेगांव तालुक्यातील पिंडकेपार हे छोटसं गाव. विविध उपक्रम राबविणारे गाव, अशी या पिंडकेपार गावाची ओळख आहे. अनेकदा या गावांनी आगळे वेगळे कार्यक्रम सादर करून एक आदर्श परिचय करुन दिलेला आहे.
यावर्षी 1 मे महाराष्ट्र दिवस संपूर्ण राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय.
अशावेळी पिंडकेपार येथील ग्रामपंचायत सरपंच योगिता ताई शहारे यांनी महाराष्ट्र दिनाचा सोहळा प्रेरणादायी करण्याचे नियोजन केले.
गावातील ज्येष्ठ नागरिक हगरुजी बिसेन याना ध्वजारोहणाचा मान देण्याचा निर्णय घेतला . व आज सोमवार 1 मे महाराष्ट्र दिवसानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय येथे त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यादरम्यान मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक हगरुजी बिसेन यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार पण करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सरपंच योगिताताई शहारे, उपसरपंच भरतजी घासले ,ग्रामपंचायत सदस्य नीलकंठजी बिसेन, चंद्रकिशोरजी पटले, मंगलाताई पटले, रेखाताई रहांगडाले, रूपाताई लटये, कला ताई चौधरी, ग्रामसेवक बैस मॅडम, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्रनाथजी मेश्राम , माजी ग्रामपंचायत सदस्य रमेशजी बिसेन, जि प शाळेचे मुख्याध्यापक पी डी पटले , शिक्षक एम टी कटरे, वाय बी बोपचे, शोभेलाल जी कटरे, विकास हायस्कूल शाळा समितीचे अध्यक्ष खोमेंद्रजी बिसेन, ग्राम रोजगार सेवक रविंद्रजी साखरे, संगणक चालक प्रशांतजी साखरे, राजेशजी चूलपार आदि मोठ्या संख्येत उपस्थित होते ज्येष्ठ नागरिककाच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयातील मुख्य ध्वजारोहण होत असल्याचे बघून गावकऱ्यांनाही आनंदोत्सवाचा सुखद धक्का बसला.
ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांना किती सन्मान मिळतो, याची जाणीव आताच्या पिढीला कळावी. या हेतूने हा निर्णय सरपंच महोदयांनी घेतला व त्याचे गावभर स्वागत झाले असून पिंडकेपार गावात घेतलेल्या या परिवर्तनीय उपक्रमाची जिल्हाभर सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे

Related posts