590 Views
गोंदिया, दि. 1 (जिमाका) : महाराष्ट्र शासन सेवेत विविध विभागात नियुक्त झालेल्या जिल्ह्यातील तेरा तरुण-तरुणींना महाराष्ट्र दिनी मुख्य समारोह कार्यक्रमात जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र वितरीत करण्यात आले.
तसेच विविध विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्यकर निरीक्षक गुलशन भोयर, लेखराज भोयर, भूकरमापक तथा लिपिक पायल बुध्दे, कार्तिक बुरडे, दलिमकुमार हत्तीमरे, अभिलाष मचाडे, अश्विन मेश्राम, दुर्गा भलमे, दुय्यम निरीक्षक शुभम चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. नितेश राऊत, डॉ. रुपेश चौधरी, डॉ. पराग रहांगडाले व डॉ. रुचा धमगाये यांचा नियुक्ती पत्र मिळालेल्यामध्ये समावेश आहे.
जिल्ह्यातील विविध शासकीय विभागात काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
एमपीएससी परीक्षेचे नियोजन व विविध निवडणूक विषयक कामे जबाबदारीने पार पाडल्याबद्दल अप्पर कोषागार अधिकारी लखीचंद बाविस्कर यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा पोलीस दलात कार्यरत राजीव केंद्रे, पांडुरंग मुंढे, ओमप्रकाश बोरेवार, तुकाराम नागरे, दीपक चौधरी, संतोष चौधरी, चेतन पटले, कासीमतायर खान, अनिल साळुंखे यांचा पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह व पदक देऊन गौरव करण्यात आला.
गोंदिया पब्लिक स्कुलचे प्राचार्य जितेंद्र तलरेजा, वर्षा भांडारकर व हरिहरभाई पटेल स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य बी. व्ही.
शहारे व व्ही. एम. येडे यांचा महसूल विभाग स्तरीय उल्लेखनीय काम केल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार देऊन सत्कार
करण्यात आला.
दिनबंधू ग्रामीण विकास संस्था देवरी यांना जिल्हास्तर युवा संस्था पुरस्कार मिळाल्याबद्दल गौरवपत्र व सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. ऋतुराज यादव व दिव्या भगत यांना जिल्हा युवा पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान चिन्ह व गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तहसील कार्यालय सडक अर्जुनी येथील तलाठी उमराव वाघधरे यांना आदर्श तलाठी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.