गोंदिया: जिल्ह्यातील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी “आपरेशन क्रॅकडाऊन”, 45 लाख 53 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त..

553 Views
प्रतिनिधि। (15अप्रैल)
गोंदिया। जिल्ह्यात हनुमान जयंती, गुडफ्रायडे , इस्टरडे , डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, या सारखे प्रमुख धार्मिक सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार असल्याने. सदर सण उत्सवाचे पार्श्व भुमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, जिल्ह्यात शांतता अबाधित राहावी, जनतेने सदरचे सण उत्सव, शांततामय वातावरणात आणि उत्साहात साजरे करावेत या करीता जिल्ह्यातील संपुर्ण अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी” आपरेशन क्रॅकडाऊन मोहीम दिनांक 05/04/2023 ते 14/04/2023 पर्यंत (सतत 10 दिवस) प्रभावीपणे युध्द पातळी वर राबविण्याबाबत जिल्ह्यातील सर्व ठाणे प्रमुखांना पुलिस अधीक्षक यांनी निर्देश देवून आदेशित केले होते.
या अनुषंगाने पोलीस अधीक्षक गोंदिया निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया, कॅम्प देवरी अशोक बनकर, यांचे आदेशान्वये  गोंदिया जिल्ह्यात अवैधं धंद्याविरुद्ध “आपरेशन क्रॅकडाऊन ही मोहीम छेडण्यात येवून जिल्ह्यातील संपुर्ण अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी “क्रॅक डाऊन मोहीम राबविण्यात आलेली आहे.
सण उत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व ठाणे हद्दीत राबविण्यात आलेल्या क्रॅकडाऊन मोहीम दरम्यान जिल्ह्यातील सर्व ठाण्यातील पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी कारवाईत सहभाग घेवून अवैध धंद्यांवर यशस्वीरीत्या प्रभावी छापे घालून खालील प्रमाणे कारवाई करण्यात आलेली असून गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
1) अवैध दारू धंद्यांवर- केलेली एकूण कारवाई – 247 किंमती एकूण 17,98,535/- रूपयाचा मुद्देमाल जप्त
2)अवैध मटका-जुगार  धंद्यांवर केलेली एकूण कारवाई- 26  किंमती एकूण 33020/- रूपयाचा मुद्देमाल जप्त
3) अवैधरित्या प्राण्यां ची वाहतुक करणाऱ्या विरुध्द केलेली कारवाई – 01, किंमती एकूण 524000/- रूपयाचा मुद्देमाल जप्त
4) अवैधरीत्या वाळू (गौण खनिज ) चोरी करणाऱ्यावर केलेली एकूण कारवाई -06 किंमती एकूण 21,98,000/- रूपयाचा मुद्देमाल जप्त
अश्याप्रकारे अवैध धंदे व्यवसायावर कारवाई करण्यात आलेली असून किंमती एकूण 45 लाख 53 हजार 555/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
पोलीस अधीक्षक गोंदिया श्री.निखिल पिंगळे यांनी जिल्ह्यातील जनतेने अत्यंत सादगीपूर्ण शांतमय वातावरणात कोणताही अनुचित प्रकार घडू न देता सण उत्सव उत्साहात साजरे केल्याबद्दल संपुर्ण गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे आभार मानलेले आहे.

Related posts