गोंदिया। जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले शेती साठी लागणार्या वस्तूंचे भाव वाढले गॅस च्या किमती वाढल्या आणि हे सर्व भार सर्व सामान्य माणूस शेतमजूर शेतकरी सोसत असतानाच मध्येच वीज नियामक मंडळाने घरगुती विजेचे प्रचंड दर वाढ केल्याने जनतेत तीव्र नाराजी पसरली आहे त्यामुळे ही दर वाढ तातडीने मागे घ्यावी अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांनी शासनाकडे व वीज नियामक मंडळाकडे केली आहे।
मागील काही दिवसांपूर्वी भारत सरकार चा अर्थसंकल्प संसदेत सादर झाला तेव्हाच नवीन सुरू होणार्या एक पासूनचे नवीन वर्षात सर्वच वस्तूचे दारात काही बदल होतील असे वाटत होते पण त्या दर वाढीचा झटका बसण्याचे पूर्वीच वीज नियामक मंडळाने आपली दर वाढ करून ग्राहकांना मोठा झटका दिला आहे यात घरगुती वीज ग्राहकांना यावर्षी 2,9 टक्के तर पुढील वर्षी 5,6 अशी दर वाढ करण्याचा निर्णय केला आहे याचा प्रचंड झटका लोकाना बसणार आहे परंतु आमचे मते ही दर वाढ नियम बाह्य असून ग्राहकांना फसवणार आहे या पद्धतीने वाढ केलेली दरवाढ मागे घेतली नाही तर या विरोधात विद्युत अपिलीय प्राधिकरणाकडे दाद मागावी लागेल असा इशारा गंगाधर परशुरामकर यांनी शासन आणि विद्युत विभागाला दिला आहे।