1 कोटींचा विक्रमी दंड वसूल करणाऱ्या पहिल्या महिला तिकीट निरीक्षक..

938 Views

 

मुंबई। जगात लाखों लोक सरकारी नोकरी करतात. पण सरकारप्रती कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा दाखवणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. आपल्या कामाला प्रथम प्राधान्य देणारे आणि त्यासाठी कठोर परिश्रम करणारे फार कमी लोक असतात. अगदी किंचित असे सरकारी कर्माची कर्तव्यनिष्ठ असतात. ज्यांच्या कर्तव्याची दखल घेत पुढे जगही त्याचा आदर करते. अशाच एका महिला रेल्वे कर्मचाऱ्याचे मंत्रालयातूनच कौतुक होत आहे. त्यामुळे रेल्वे विभागाला कोट्यवधींचा नफा झाला आहे.

भारतीय रेल्वे मंत्रालयातील सुमारे 1 कोटींचा विक्रमी दंड वसूली करणाऱ्या पहिल्या महिला तिकीट निरीक्षकांचे राज्य स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे. खुद्द भारतीय रेल्वे मंत्रालयानेसुद्धा या महिला तिकीट निरीक्षकाचे कौतुक केले आहे. दक्षिण रेल्वेच्या मुख्य तिकीट निरीक्षक रोजालिन अरोकिया मेरी यांनी तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून यशस्वीरित्या तब्बल 1.03 कोटी दंड वसूल केला आहे. तिकीट नसतानाही प्रवास करणारे आणि तिकीट असतानाही चुकीच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकडून हा दंड वसून करण्यात आला आहे. रेल्वेच्या परिवहन मंत्रालयाने महिला तिकीट तपासनीसाचे कौतुक करणारे ट्विट केले.

 

पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ” कर्तव्याप्रती दृढ वचनबद्धता दाखवत, @GMSRailway च्या CTI (मुख्य तिकीट निरीक्षक) श्रीमती रोझलिन अरोकिया मेरी, भारतीय रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचार्‍यांमध्ये ₹ 1.03 कोटी दंड वसूल करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “आमच्या भारताला महासत्ता बनवण्यासाठी आम्हाला अशाच आव्हानात्मक आणि समर्पित महिलांची गरज आहे. रोझलीन यांचे अभिनंदन अशाच प्रगती करत राहा. अजून एका युजरनं म्हटलं की, रोझलिन, मला तुझा मित्र असल्याचा अभिमान आहे.तु झ्या कर्तृत्वाने मला आश्चर्य वाटले नाही. तुझ्या कर्तव्याप्रती तुझे समर्पण, वचनबद्धता आणि प्रामाणिकपणा दाखवते.”

दरम्यान काही दिवसांपूर्वी, रेल्वेने तिकीट नसलेल्या प्रवाशांवर कारवाई केल्याबद्दल आणि देशातील सर्वाधिक दंड वसूल केल्याबद्दल चेन्नई विभागाचे कौतुक केले होते. येथे तीन तिकीट तपासनीसांनी नवा विक्रम केला आहे. रेल्वे चेन्नई विभागाचे मुख्य तिकीट निरीक्षक एस. नंद कुमारने एका वर्षात 27,787 लोकांना पकडले आणि त्यांच्याकडून एकूण 1.55 कोटी रुपये वसूल केले. हा सुद्धा एक विक्रम आहे. त्यांच्याशिवाय वरिष्ठ तिकीट निरीक्षक शक्तीवेल यांनी रेल्वे नियमांविरुद्ध सामान घेऊन जाणाऱ्या आणि विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 1.10 कोटी रुपये वसूल केले आहेत.

Related posts