जीएमसी गोंदिया च्या वतीने शिवजयंती निमित्त महारक्तदान शिबीर, ८० रक्तदात्यांनी केले रक्तदान

292 Views

गोंदिया–शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया यांच्या तर्फे आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महाराष्ट्र शासन, वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे अंतर्गत रक्तदान अभियान राबविण्यात आले आहे. या अभियानात विविध ठिकाणी ८० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.

महाविद्यालय परिसरात अधिष्ठाता डॉ. कुसूमाकर घोरपडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतीमा पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर रक्तदानाविषयी जनतेमध्ये जागृती करण्यात आली. वसतिगृह व महाविद्यालय परिसरामध्ये महाराजांच्या पालखी समवेत अभियानाच्या पोष्टरसह प्रभातफेरी काढण्यात आली.

या प्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया तर्फे तीन वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. पीएसएम हॉल बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथे ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच सडक अर्जुणी येथील रक्तदान शिबिरामध्ये ४३ रक्तदात्यांनी रक्तदान केले व गोरेगाव या गावामध्ये ०७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या सर्व रक्तदात्यांना शासनातर्फे प्रमाणपत्र देण्यात आले.
सदर कार्यक्रमा प्रसंगी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांना मार्गदर्शनपर भाषण केले. डॉ. चंद्रशेखर चांदेकर, सेवानिवृत्त प्राध्यापक, शिवाजी विज्ञान महाविद्यालय, नागपूर यांना प्रमुख वक्ते आंमत्रित करण्यात आले होते. त्यांनी कार्यक्रम प्रसंगी सर्व अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांना मागदर्शन केले. सदर कार्यक्रमासाठी जिल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, डॉ. एन. जी. राऊत, नेत्रविभागप्रमुख, डॉ. प्रविण जाधव, सहयोगी प्राध्यापक, दिलिप गेडाम, सहयोगी प्राध्यापक, डॉ. अर्चना रंदाळे, सहयोगी प्राध्यापक व श्रीमती सुरेखा व्याहाडकर, सहायक अधिसेविका हे मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी डॉ. मनू शर्मा, सहायक प्राध्यापक, डॉ. संजय माहुले, उप वैद्यकीय अधिक्षक, डॉ. पल्लवी गेडाम, सहायक प्राध्यापक तथा रक्तकेंद्र प्रमुख, डॉ. पुजा बोंबार्डे, वरिष्ठ निवासी, विकृतीशास्त्र विभाग विलास डाहारे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, हरिचंद्र कटरे, वरिष्ठ लिपिक, शिवम घारड, लघुलेखक सचिन ढोले, शैलेंद्र बनसोड आणि महाविद्यालयीन विद्यार्थी व परिचर्या प्रशिक्षणार्थी यांनी परिश्रम घेतले.
वैद्यकीय शिक्षण विभागाचे वतीने गिरीश महाजन, मंत्री वैद्यकीय शिक्ष सचिव डॉ. अश्विनी जोशी, आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले व डॉ. विवेक पाखमोडे तसेच रामेश्वर नाईक यांचे मार्गदर्शनानुसार संपुर्ण अभियान राबविण्यात येत आहे.

Related posts