कुऱ्हाडी येथे खा. प्रफुल पटेल व सौ. वर्षाताई पटेल यांचा वाढदिवसानिमित्त विभिन्न कार्यक्रम

80 Views

 

भव्य रोग निदान व रक्तदान शिबिर, बचत गट, शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शनी व साहित्य वाटप

 

गोंदिया। खा. प्रफुल पटेल व सौ. वर्षाताई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात व राष्ट्रवादी काँग्रेस गोरेगाव तालुका अध्यक्ष केवल बघेले व पक्ष पदाधिकारी यांच्या पुढाकाराने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात जनतेचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आरोग्य शिबीर, महिला सक्षमीकरणाकरिता महिला मेळावा व बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित मालाचे स्टाल, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकरी मेळावा व कृषिप्रदर्शनी तसेच नवयुवक व जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, अपंगांना साहित्य वितरण, बचत गट व उत्कृष्ट कार्य कार्यकर्त्यांना प्रशस्ती पत्रक देण्यात आले. तसेच आरोग्य तपासणी करून औषध वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाचे आयोजन शाहिद जाम्या तिम्या स्मारक कुऱ्हाडी च्या प्रागंणात शिवजी भोलेबाबा, छत्रपती शिवाजी महाराज, शाहिद जाम्या तिम्या स्मारकाचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन डॉ. वज्रा पुष्पराज गिरी, प्रशस्ती पत्रकाचे वितरण माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अनिल मडावी हे होते. याप्रसंगी केक कापून मा. खा. प्रफुल पटेल व सौ. वर्षाताई पटेल यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमार प्रामुख्याने सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, केवल बघेले, डॉ. वज्रा पुष्पराज गिरी, अनिल मडावी, डॉ. पुष्पराज गिरी, हिरणताई तिरले, हेमराज सोनवणे, सुनील कापसे, गणेश बघेले, अनिताताई तुरकर, लालचंद चौहान, देवेंद्र ठाकरे, धुरपता कटरे, चंद्रशेखर राणा, आनंद कटरे, भूपेश गौतम, खुशाल वैद्य, संघमित्राताई धमगाये, संजय आमदे, भैय्यालाल गिरहेपुंजे, डी. एम. राऊत, केशव धरात, माणिक हरिनखेड़े, धनराज दहीकर, ज्ञानेश्वर कटरे, ज्ञानेश्वर शहारे, भूमेश्वर राऊत, देवराज कापसे, गजेंद्र बुरडे, ताराचंद शहारे, मनोज ठाकरे, दिगंबर बोपचे, कुंदाजी पटले, जयशीला नांदगाये, शेख मैडम, यादव मैडम, अज्जू भाई, जब्बार भाई, राजेश उकरे, लेखराम पडोळे, गैंदलाल वैद्य सहित बहुसंख्येने प्रमुख मान्यवर व पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ता व ग्रामवासी उपस्थित होते.

Related posts