कृषि विभागाच्या मार्गदर्शना खाली कटंगटोला मध्ये संपूर्ण गाव पट्टा पद्धतीने भात लागवड करणार

452 Views

 

गोंदिया – कटंगटोला हे गाव गोंदिया पासून 18 कि.मी. अंतरावर वाघ नदीच्या किनाऱ्यावर बसलेले आहे.

गावाची लोक संख्या 1850 असून भौगोलिक क्षेत्र 831.64हेकट्टर आहे. उन्हाळी भात लागवड खाली क्षेत्र 150 . 00 हे,क्टर आहे.

ते संपूर्ण पट्टा पद्धतीने लागवड करण्याचा निर्धार आहे. श्री. जी.डी.नेवारे कृषि सहायक यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी भेटी देवून पट्टा १० फुटा नंतर दीड फुटाच्या 0.45 पट्‌टा सोड‌णे.

त्यामुळे पट्ट्या मधून औषध फवारणी करता येते, सुर्यप्रकाश भरपुर मिळते. त्यामुळे रोपाची वाढ होऊन पाचरे,फुटवे जास्त फुटतात. व रोग किड पासून बचाव होते. व उत्पन्नात 24 ते 30/- वाढ करता येते. असे जी. डी. नेवारे. कृषि सहाय्यक यांनी मार्गदर्शन केले,

सौ. रेखाबाई नरेश बाहे यांच्या शेतात जाऊन पट्टा पद्धतीने लागवड करण्यात आली. त्या वेळेसे रेखाबाई बाहेकृषि सखी यांनी पट्‌टा पद्धती लागवडी बाबद आपले विचार व्यक्त केले.

संपूर्ण गावात पट्टा पद्धतीने बचत गटाच्या मदतीने लागवड करणार असे सांगीतले. तसेच राजेन्द्र बाहे यांनी पट्टा पद्धतीचे महत्व व फायदे बाबद आपले मनोगत व्यक्त केले. त्या वेळेस हरि बाहे, नरेश बाहे, कबीर बाहे, कृषिमित्र मनोहर आसोले उपस्थीत होते.

Related posts