संघटन मजबूती हाच विजयाचा कानमंत्र – माजी आमदार श्री राजेन्द्र जैन

169 Views

 

गोंदिया। शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची महत्त्वपूर्ण बैठक माजी आमदार श्री राजेन्द्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली, गोंदिया येथे संपन्न झाली. यावेळी गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यता नोंदणी अभियाना ची समिक्षा, वॉर्ड निहाय बूथ कमेटी चे गठण करण्याबाबत व संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला माजी आमदार श्री राजेन्द्र जैन संबोधतांना म्हणाले की, आगामी गोंदिया नगरपरिषद निवडणुकीला सामोरे जातांना प्रभागातील जनतेच्या पसंतीचा व सक्षम उमेदवारांची निवड केली जाईल. त्यादृष्ठीने प्रभाग निहाय बैठकीचे आयोजन करून प्रभागातील परिस्थितीचा आढ़ावा घेण्यात येईल. तसेच पक्ष वाढीकरिता शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विविध आघाडी व सेल चे संघटन मजबूत करने गरजेचे आहे. जास्तीत जास्त महीला व युवकाना राष्ट्रवादी कॉन्ग्रेस पक्षाशी जोड़न्याचे कार्य करावे. नगरपरिषदेतील ५० टक्के जागा महिला आरक्षित असून राष्ट्रवादी महिला काँग्रेस चे संघटन मजबूत करने गरजेचे आहे. शहरातील प्रत्येक वार्डात विविध उपक्रम व कार्यक्रमाच्या माध्यमातून खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या प्रयत्नाने झालेल्या गोंदिया शहरातील विकासात्मक कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम आपण सर्वानी करावे.

कार्यक्रमात सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, विनोद हरिणखेडे, अशोक शहारे, आशाताई पाटील, मनोहर वालदे, प्रेम जैस्वाल, सुनील भालेराव, विनीत सहारे, दिनेश अग्रवाल, राजेश कापसे, आनंद ठाकूर, चंद्रकुमार चुटे, रमेश कुरील, विजय रगडे, सुशीला भालेराव,सौ. कुंदा दोनोडे, विनायक खैरे, सौरभ रोकडे, एकनाथ वहिले, राहुल वालदे, श्रयेश खोब्रागडे, दिलीप पाटील, नागो सरकार, संदीप पटले, विजेंद्र जैन, राजेश दवे, प्रदीप ठवरे, शैलेश वासनिक, लवली होरा, विक्की बाकरे, सौ. सुदर्शना वर्मा, जयंत कचवाह, मोहमद खालिद युसुफ खान, सौ. पूष्तकला माने, लखन बहेलिया, मोहन पटले, विष्णू शर्मा, महेश कारियार, प्रतीक भालेराव, त्रिलोक तुरकर, लव्ह माटे, योगेश दर्वे, आकाश नागपुरे, रजत उपवंशी, सुनील भजे, प्रशांत मेश्राम, सौ. सोनम मेश्राम, सौ. दीक्षा मेश्राम, सौ. शोभा रामटेके, सौ. प्रमिला, सौ.रविकांता गेडाम, सौ. दिव्या गेडाम, बसंत गणवीर, श्याम चौरे, छोटू पंचबुद्धे, हरिराम अशवाणी, रवी मुंदडा, दर्पण वानखेडे, अविनाश महावत, राज शुक्ला, प्रवीण बिसेन, रणजित शेंडे, वामन गेडाम, कपिल बावनथडे, कुणाल बावनथडे, दीनदयाळ मानकर, भोजराज डूभरे, रेवाजी टेटे, सौ. पुष्पा पचेश्वर, सौ. पुष्पा मरठे, सौ. शकुन माने, सौ. गुणवंती पंचेश्वर, सौ. विद्या कोल्हे, सौ. ममता राऊत, हाजी अहमद भाई, हरबक्ष गुरनानी, अश्फाकभाई तिंगाला, लक्ष्मीकांत दहाट, योगी येडे, सुरेश पटले, शरभ मिश्रा व अन्य उपस्थित होते.

Related posts