गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 27 मे ला रब्बी धान खरेेदी मर्यादा वाढवून मागण्यासाठी केद्र सरकारचे विरोधात धरणे आंदोलन व धडक मोर्चा

194 Views

 

प्रतिनिधि। 25 मे

गोंदिया। जिल्हयातील या वर्षीच्या उन्हाळी हंगामातील सुमारे 68 हजार हेक्टर शेतजमिनीवर उन्हाळी धानाची लागवड केली आहे. मागील वर्षी २२ लाख क्विंटल उन्हाळी धान खरेदी झाली होती. त्यानुसार या वर्षी राज्य शासनाने केद्र शासनाकडे सुमारे 30 लाख क्विंटल धान खरेदी ची परवानगी मागीतली होती. पण केंद्र शासनाने फक्त 11 लाख क्विंटलची संपूर्ण राज्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना सुमारे एकरी 8 क्विंटल धान विकता येईल.

यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरवाती पासूनच हि मर्यादा वाढवून दयावी म्हणून प्रफुल पटेल यांचे मार्फत प्रयत्न सुरु केले. पण अजूनपर्यत केंद्र शासनाने मर्यादा वाढवून दिली नाही. यामुळे शेतकऱ्यांचा धान निघाल्या पासून शेतकऱ्यांच्या समोर अडचण निर्माण झाली आहे. तसेच पेट्रोल, डिझेल व सिलेंडर गॅसच्या किंमतीत वाढ यामुळेही सामान्य माणूस अडचणीत आला आहे.

केंद्र सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणा विरोधात गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 27 मे रोज शुक्रवारला दुपारी 01.00 वाजता माजी आमदार श्री राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर यांच्या नेतृत्वात करण्यात येईल. या धरणे आंदोलनाला सर्व पदाधिकारी, कार्यकर्ता व शेतकरी यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री योगेंद्र भगत यांनी केले आहे.

Related posts