गोंदिया: सेंट्रल कृषक सेवा सहकारी संस्था गोंदिया च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, चाबी संगठन, काँग्रेस प्रणित शेतकरी विकास पॅनलचा विजय

523 Views

 

प्रतिनिधि।

गोंदिया। खासदार प्रफुल पटेल यांच्या मार्गदर्शनात व राजेंद्र जैन यांच्या अथक प्रयत्नातून सेंट्रल कृषक सेवा सहकारी संस्था गोंदिया च्या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व संचालकांचा राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली गोंदिया येथे नवनिर्वाचित सेंट्रल कृषक सेवा सहकारी संस्था मर्या.गोंदिया ता.गोंदिया च्या विजयी सर्व १३ संचालकांचा पुस्पगुच्छ व गमचा घालून सत्कार करण्यात आला.

यावेळी सर्वश्री विनोद हरिणखेडे, बाळकृष्ण पटले, अशोक सहारे, रफिक खान, गणेश बरडे, नीरज उपवंशी, इकबाल सय्यद, नितीन टेभरे,सतीश कोल्हे, शैलेश वासनिक,अचल गिरी, धर्मेंद सतिसेवक, राजू गौतम, कपिल बावनथडे, कुणाल बावनथडे, उपस्थति होते.

गोंदिया जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्थामध्ये सर्वात मोठी सेंट्रल कृषक सेवा सहकारी संस्था मर्या.गोंदिया ता.गोंदिया च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, चाबी संगठन, काँग्रेस प्रणित शेतकरी विकास पॅनल च्या सर्वसाधारण गटातून श्री रमेश गौतम, मदन चिखलोंढे, जितेश टेभरे, केवलचंद रहांगडाले, मंगल ठाकरे, भाऊलाल रहांगडाले, बाबा पगरवार, दिनेश तुरकर, इतर मागास प्रवर्गातून श्री राजेश ठाकरे, अनुसूचित जाती, जमाती संघ यातून श्री होमनदास पटले, विमुक्त भटक्या जाती मधून श्री सचिन बडगुजर, महिला राखीव मधून श्रीमती मीना बावनकर, श्रीमती तरासन पतेह सर्व १३ संचालकांचा भरघोष मतांनी विजय झाला.

सेंट्रल कृषक सेवा सहकारी संस्था हि गोंदिया तालुक्याच्या ३२ गावांमध्ये कार्यरत आहे. ह्या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी कर्ज, दूध संकलन , शेती संबंधित सर्व प्रकारच्या सुविधा, बी – बियाणे, खते, व शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र वर धान खरेदी करून अन्य बाबतीत शेतकऱ्यांना मदत करण्याचे कार्य सेंट्रल कृषक सेवा सहकारी संस्था द्वारे केले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने सर्व विजयी संचालकांचे अभिनंदन करून शुभेच्या देण्यात आल्या.

Related posts