प्रतिनिधि। 27 एप्रिल
गोंदिया : गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यातील नागरी संस्थांची विकासकामे गेल्या ५ वर्षापासून खुंटली होती. दरम्यान खा.प्रफुल पटेल यांनी शहराच्या विकासकामांना गती देण्याचे आश्वासन दिले होते. यानुरूप नगरविकास मंत्रालयाशी पाठपुरावा करीत दोन्ही जिल्ह्यातील नागरी संस्थांना अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याच्या सुचना केल्या. यामुळे नगर विकास मंत्रालयाने विशेष रस्ता अनुदान व वैशिष्टपूर्ण लेखाशिर्षकातंर्गत गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा व गोंदिया या दोन्ही नगर परिषदेकरीता ७ कोटी १८ लाखाचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून शहराच्या वैशिष्टपूर्ण कामासह अनेक रस्त्यांचे बांधकाम पूर्णत्वास येणार आहेत. यामुळे गोंदिया शहरवासीयांनी खा.प्रफुल पटेल यांचे आभार मानले आहे.
गोंदिया व तिरोडा या दोन नागरी क्षेत्रासह भंडारा जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगर पंचायतीच्या विकासकामांना गती देण्याच्या अनुसंगाने खा.प्रफुल पटेल यांनी कोरोना संसर्ग संपुष्टात येताच राज्य शासनाशी पाठपुरावा केला. नगरविकास मंत्रालयाशी संपर्क करून दोन्ही जिल्ह्यातील नगर पंचायत व नगर परिषदांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली.
यानुरूप नगरविकास मंत्रालयाने वैशिष्टपूर्ण व विशेष रस्ता अनुदान लेखाशिर्षकातंर्गत तिरोडा व गोंदिया या दोन्ही नगर परिषदांकरीता ७ कोटी १८ लाखाचा निधी मंजूर केला आहे.
वैशिष्ट्यपूर्ण योजनेतंर्गत गोंदिया नगर परिषदेकरीता ४५ लाख व तिरोडा नगर परिषदेकरीता ३२ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे विशेष रस्ता अनुदान या लेखाशिर्षकातंर्गत गोंदिया नगर परिषदेकरीता १ कोटी ४१ लाख व ३ कोटी २४ लाख ४० हजार तसेच तिरोडा नगर परिषदेकरीता १ कोटी ९ लाख ८० हजार व १ कोटी १० लाख असा दोन्ही नगर परिषदेकरीता विशेष रस्ता अनुदान अतंर्गत ६ कोटी ६४ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. वैशिष्टपूर्ण व विशेष रस्ता अनुदान या दोन्ही योजनेतंर्गत गोंदिया जिल्ह्यातील दोन्ही नगर परिषदांना ७ कोटी 62 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. हे खा.प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्याचे फलित आहे.
या माध्यमातून गोदिया व तिरोडा शहराच्या विकासकामांना गती मिळणार आहे. गोंदिया व तिरोडा या दोन्ही शहराच्या विकासकामांसाठी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी खा.प्रफुल पटेल यांचे लक्ष वेधले होते हे विशेष।