भाजपचे ‘मच्छर मारो’ आंदोलन, हातात मच्छर मारण्याची बॅट, फवारणी मशिन व विरोधातील फलक घेवून नगर परिषद प्रशासनाविरोधात नारेबाजी…

375 Views

 

गोंदिया : नगर परिषदेवर प्रशासक राज सुरू असून संपूर्ण शहरात स्वच्छता व्यवस्था पूर्णत: कोलमडली आहे. नाल्या तुंबल्या असून नियमित सफाई होत नाही. या अस्वच्छतेमुळे मागील काही दिवसांपासून शहरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून डेंग्यू, मलेरिया सारखे रोगांचा प्रसार होत आहे. या गंभीर बाबीकडे नगर परिषद प्रशासनाला निवेदन देवून समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने भारतीय जनता पार्टीतर्फे आज (ता.८) नगर परिषदेवर धडक मोर्चा काढून ‘मच्छर मारो’ आंदोलन करण्यात आले. यानंतर मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना निवेदन देण्यात आले.

भाजप कार्यालयातून निघालेला मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने होत नगर परिषदेवर धडकला. यावेळी कार्यकर्त्यांनी हातात मच्छर मारण्याची बॅट, फवारणी मशिन व विरोधातील फलक घेवून सहभागी झाले होते. नगर परिषद प्रशासनाविरोधात नारेबाजी करीत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रोश व्यक्त केला. नगर परिषदेने तत्काळ लक्ष देवून प्रभागांमध्ये स्वच्छता मोहिम राबवून डासनाशक औषधी फवारणी करावी, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करणार, असा इशाराही भाजपच्या वतीने निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी आंदोलनात भाजपचे जिल्हा महामंत्री (संघटन) संजय कुलकर्णी, शहर अध्यक्ष सुनिल केलनका, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष दिपक कदम, जि.प.सदस्य व किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष गजेंद्र फुंडे, उत्तर भारतीय मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित झा, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष नारायण चांदवानी, जिल्हा उपाध्यक्ष अशोक चौधरी, विद्यार्थी मोर्चा जिल्हाध्यक्ष पारस पुरोहित, भाजयुमो शहर अध्यक्ष पलास लालवानी, माजी सभापती बंटी पंचबुध्दे, अफसाना पठाण, वर्षा खरोले, मोसमी परिहार, हेमलता पतेह, मनोहर आसवानी, जिल्हा सचिव ऋषिकांत साहू, शंभुशरणसिंह ठाकूर, संजय मुरकूटे, रमेश दलदले, शालिनी डोंगरे, धर्मिंष्ठा सेंगर, रिता बागडे, शुभा भारव्दाज, राजेश बघेल, दिलीप गोपलानी, क्रांती जायस्वाल, मोन्टू पुरोहित, मनोज पटनायक, गोल्डी गावंडे, चंद्रभान तरोणे, मुकेश चन्ने, दिपम देशमुख, अशोक जयसिंघानी, मिलिंद बागडे, सतिश मेश्राम, मनिष पोपट, प्रशांत कोरे, राजेश खरोले, सुनिल तिवारी, मनिष जायस्वाल, बबली चौधरी, गुड्डू चांदवानी, सुभाष मुदंडा, अंकित जैन, रवि रामटेककर, राकेश अग्रवाल, सुशिल राऊत, बबलु रहांगडाले, पुरुषोत्तम ठाकरे, जसपाल चावला, चेतन सोनछात्रा, अमर रंगारी, सुमित महावत, पुरन पाथोडे, दलजितसिंग खालसा, मुन्ना उरकुडे, चिंटू सोनपुरे, बंटी शर्मा, मुजीब पठाण, रितेश साहू, अर्पित पांडे, कमल पुरोहित, राजेश मुनिश्वर, सुजीत ठाकूर, बाळा मुनिश्वर, कृष्णकुमार लिल्हारे, लक्ष्मी चौधरी, प्रिती बन्सोड, भारती सुरसे, रिता पाऊलझगडे, गिता तुपकर, योगिता कुलकर्णी, मंगलेश गिरी, रामेश्वर लिल्हारे आदिंसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Related posts